थोडा है थोडे की जरुरत है @ 04.07.23
साधे .. सोप्पे .. नि सहज !! काल डायनींग टेबलवर ब्रेकफास्ट करताना दोन गोष्टी सोबत दिसल्या . त्या अगदी सहजच तेथे ठेवलेल्या होत्या . त्या दोन्हीही गोष्टी एकत्र बघितल्यावर मन अचानक भूतकाळात रेंगाळू लागले . अचानक मी चाळीस वर्षे मनाने मागे गेलो . या दोन गोष्टी ज्या मला डायनींग टेबलवर दिसत होत्या त्यांचा त्या काळात केलेला वापर व त्यामधून मिळणारा तो आनंद किती अफाट होता हे मी मनाने अनुभवायला लागलो . सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व प्रक्रियेमधे किती सहजता होती . हे सारे मनात असतानाच अगदी योगायोगाने माझ्या एका मित्राचा फोन आला . माझ्या मनातल्या त्या विचाराच्या अगदी विरोधातील एका गोष्टीने त्रस्त होऊन त्याने फोन केला होता . तो मला म्हणाला , किती किचकट बनवलंय यार हे नवं शिक्षण तुम्ही लोकांनी ? त्याच्या मुलांच्या शाळेत काहीतरी झालेय हे माझ्या लक्षात आले . नेमके काय झाले हे मला कळल्यावर मात्र माझ्या समोर डायनींग टेबलवरच्या त्या दोन गोष्टींनी किती सहजतेने माझ्या विद्यार्थी दशेत ...