Posts

Showing posts from November, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.11.21

Image
धिरोदात्तपणामागील हळवेपण तशी त्यांची ख्याती अतिशय शिस्तप्रिय आणि कडक व्यक्तिमत्व म्हणूनच . एका मोठ्या संस्थेचा एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे सोपे काम नव्हते . वेगवेगळे लोक , वेगवेगळे प्रसंग , वेगवेगळ्या समस्या . या सर्व बाबींना सामोरे जात नकळत एक जरब बसविणारे व्यक्तिमत्व तयार होत गेले . वेगवेगळ्या प्रसंगांना धीराने तोंड देण्याची सवयच झाली असल्याने धीरोदत्तपणा हा स्वभावाचा मूळ भाग बनणे स्वाभाविक व क्रमप्राप्त होते . परंतू या धिरोदत्तपणामागे एक संवेदनशील मन होते जे कधीच कुणाला दिसले नाही . ते दिसू नये याची त्यांनी देखील फार काळजी घेतली होती . एक मोठी संस्था चालवायची म्हणजे ते आवश्यकच होते . पण एका प्रसंगी मात्र हा धिरोदत्तपणा गळून पडला व त्या दिवशी मानवी मनाची एक नवी ओळख झाली . मानवी मन फारच अनाकलनीय असते . म्हणूनच मानवी मनाचा अभ्यास हा सर्वात जटील मानला जातो . कारण यामधे जेवढ्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत तेवढ्या इतर कोणत्याही अभ्यासामधे नाहीत . प्रत्येक व्यक्तीचे