Posts

Showing posts from October, 2017

Thoda hai thode ki jarurat hai @31.10.17

Image
भय इथले … ग्रेसांच्या एका कवितेत त्यांनी एक ओळ लिहीलीय … भय इथले संपत नाही . या एका ओळीचा कधीतरी गांभिर्याने विचार आपण केला तर जीवनाच्या किती वेगवेगळ्या पातळीवर ही ओळ लागू पडते याचा आपल्याला साक्षात्कार व्हायला लागतो . माणूस तसा कितीही ताकदवान असल्याचा आभास निर्माण करीत असला तरी देखील सामान्यपणे जगताना भय त्याचा पिच्छा सोडत नाही . काळ आधुनिक होत जातोय पण त्यानुसार भय कमी व्हायला हवे परंतू तसे होताना दिसत नाही . उलटपक्षी भयाच्या कक्षा वाढू लागल्यात आणि आपण जास्त अडकू लागलो . घरी चोर येऊन चोरी करुन जातील इथपासून तर माझ्या मोबाईलवरील माझा अकाऊंट कुणी हॅक करेल इथपर्यंत वेगवेगळे भय आपल्याला सतावत राहतात . परंतू सामान्यपणे जगण्याच्या कक्षा रुंदावणारी मंडळी मात्र या भयावर मात करतात … ग्रेसांच्या भय इथले संपत नाही ला ते लोक जगून आणि खंबीरपणे भय इथले संपविन मी … असे उत्तर देतात . तेच खरे सुपरस्टार असतात … मी नाही माझी आई खरी सुपरस्टार आहे असे जेव्हा त्या नितांत स