Posts

Showing posts from July, 2016

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
संवेदनशील मन आठव्या वर्गात गेलेल्या त्या लहानग्याचे आजोबा त्याला उन्हाळ्यात सोडून गेले. गेले अनेक दिवस त्याचे आजोबा आजारी होते. एक दुर्धर आजार झाला होता त्यांना. त्या आजारामुळे त्यांना फार त्रास व्हायचा. बरेच वेळा दवाखान्यात न्यावे लागायचे. आजारामुळे आजोबा कायम घरीच असायचे व या लहानग्याला त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची खूप सवय झाली होती. शाळेतून आल्यावर आजोबांशी शाळेतील गंमती जमती बद्दल गप्पा मारणे, रात्री आजोबांसोबत बसून त्यांच्याकडून गोष्टी ऐकणे, आजोबा पलंगावरच असल्याने त्यांना काही लागले तर बघणे, शाळेत जाताना आजोबांना मस्तपैकी बाय आबा म्हणून जाणे असा त्याचा दिनक्रम होता. आजारी असले तरी आजोबा आपल्या घरातील महत्वाची व्यक्ती आहेत हे त्याला सतत जाणवायचे. याचे कारण घरातील सर्व जण आजोबांची खूप काळजी घ्यायचे. विशेषतः या बाळाचे आई वडील त्यांना फार जपायचे. आपल्या आजोबांसाठी आपले आई वडील कसे झटतात हे तो पोरगा बघत असायचा. आजोबांचे पाय चेपून देणे, आजोबांना दवाखान्यात नेणे, त्यांची औषधे आणणे, त्यांच्याजवळ दवाखान्यात बसून राहणे, त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालणे, त्यांची सेवा करणे

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

गुरु प्रतिष्ठा आपल्या देशातील कुणालाही गुरु महात्म्य समजावून सांगावे लागत नाही कारण गुरु शिष्य परंपरांच्या आधारेच या देशाच्या विचार क्षमतेचा व क्रीयाशीलतेचा आधार तयार झालेला आहे. प्राचीन काळात तर गुरु शिष्य परंपरा ही सर्वात थोर अशी व्यवस्था मानली जायची. या प्रक्रीयेमधील केंद्रस्थानी असलेला गुरु सर्वश्रेष्ठ मानल्या जायचा व गुरुचे स्थान समाजामधे अतिशय उच्च दर्जाचे होते. अत्यंत विद्वान असणारे हे गुरु सामाजिक व राजकीय व्यवस्थांमधेही आपले महत्व टिकवून होते. राजाच्या दरबारात राजाने आपल्या सिंहासनावर गुरुला बसवून त्याचा सन्मान करणे यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज्य कारभारातील महत्वाच्या निर्णयांमधे गुरुचे मत ग्राह्य धरले जायचे. त्यांच्या निरपेक्ष वृत्तीचा व तटस्थ निर्णय क्षमतेचा समाजाला फायदाच व्हायचा. निर्णय प्रक्रीयेमधे गुरुंना स्थान दिल्यामुळे समाजात गुरुंकडे बघण्याची दृष्टी सन्मानाची व आदराची होती. गुरुंना सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या ज्ञानाच्या आधारे आपल्या जीवनाचा सकल विकास होतो ही बाब सर्वदूर स्विकारल्या गेल्यामुळे गुरुंना कायमच आपल्या समाजात उच्च दर्जा प्राप्त झाला होता. गुरु या पदाचे

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
अदरकवाली चाय पावसाचे चिंब ओले दिवस..पावसाच्या आगमनाने पायथ्यापासून तो माथ्यापर्यंत हिरवागार झालेला अभेद्य रायगड.. रायगडावरचे ते सुंदर टुमदार रेस्ट हाऊस..त्या रेस्ट हाऊसच्या समोर टाकलेल्या दोन खुर्च्या..त्यावर बसलेले दोन मित्र..पाऊस पडून गेल्याने आता धुक्याचा अंमल सुरु झालेला..वातावरणात रागडावर सुटणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे बोचरा पण सुखद गारवा..दोन्ही मित्रांचा आवडता कवी गुलज़ार आणि त्याच्या कवितांचे वाचन..त्यामधील भन्नाट कवीकल्पना दोघांनाही कळल्यामुळे व मनाला भिडल्यामुळे एकाच वेळी निघालेले - क्या बात है यार!..एखाद्या कवितेच्या वाचनानंतर अचानक विचारांमधे गर्क होऊन रायगडाच्या त्या विलोभनीय शांततेशी एकरुप होण्याचा प्रयत्न..त्या शांततेचा गुंजारव अनुभवण्याचा प्रयत्न..अचानक मेहंदी हसनची आठवण..मित्राच्या आग्रहाखातर रंजीश ही सही चे गायन..त्याच्या - माना के महोब्बत का छुपाना है महोब्बत, चुपकेसे किसी रोज़ जताने के लिये आ - या ओळीला दिली जाणारी एकत्रीत दाद..जिवलग मैत्री असल्याने संवादाचे विषय सारखेच..गप्पांच्या ओघात मग रागडावरील त्या सायंकाळी महाराजांचेही स्मरण..मग बाबासाहेब पुरंदरे व शिवकल्याण र

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
करीयर या वर्षीही बारावीचा निकाल लागल्यावर सर्व जागरुक पालक आपापल्या मुलामुलींच्या करीयर प्लॅनींगच्या दृष्टीने विचार करु लागले. मुलाला किंवा मुलीला कोणत्या विद्याशाखेमधे प्रवेश द्यायचा यासंबंधी चर्चा सुरू झाल्या. अश्याच एका चर्चेमधे मला सहभागी व्हावे लागले होते. त्या चर्चेमधे त्या मुला-मुलींच्या समुहाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या विद्याशाखांचे जसे कला शाखा, वाणिज्य शाखा व विज्ञान शाखा याचे प्रतिनिधी आलेले होते. मला या सर्व चर्चेवर अंतिम मत प्रदर्शित करण्यासाठी बोलाविले होते. मी त्या सभेचा अध्यक्ष असल्याने सर्वांची मते ऐकल्यानंतर माझे मत मांडायचे होते. वेगवेगळ्या विद्याशाखांच्या प्रतिनिधींनी जी मते मांडली ती ऐकल्यावर मी अक्षरशः चकित झालो. शिक्षणाचे समाजातील महत्व व त्याचा समाजनिर्मितीमधील सहभाग ज्या मूळ हेतूने आखण्यात आला होता त्यापासून अगदी वेगळ्या दिशेला आपण निघालो असल्याची जाणीव मला झाली. गेल्या काही वर्षांमधे स्पर्धा या भयानक प्रकाराच्या आड आपण शिक्षणाचे मूळ संदर्भ बदलवून टाकले व त्याला आता एका वेगळ्याच स्वरुपात राबविणे सुरु झाले आहे. या विविध विद्याशाखांच्या प्रतिनिधींनी आपा