Posts

Showing posts from January, 2024

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

Image
निखळ आनंदाची शाळा रविवारी शाळा भरली . खरे तर रविवारी सुटी असते . परंतू ही एक विशेष शाळा होती . या शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी वय वर्षे ५० ते ७० या वयोगटातले होते . वयं मोठी असली तरी ते सारे आज विद्यार्थी होते . या विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्वांजवळ चार चाकी गाड्या असुनही सर्व जण पायी किंवा सायकलवर शाळेत आले होते . सोबत डबा आणला होता . खास या शाळेकरीता शिवलेला गणवेष त्यांनी परीधान केला होता . खूप वर्षानंतर पुन्हा सर्व विद्यार्थी शाळेत आले होते . त्यातले जे लोक समुहाने आले त्यांचे ठीक होते परंतू जे एकटे आले ते तर भांबावून गेले होते . तीस पस्तीस वर्षांनंतर परत एकदा शाळेत आल्यावर त्यांना त्यांच्या वर्गातील मित्र शोधणे फार कठीण झाले . दूर उभा असलेला माणूस पाहिल्यासारखा वाटतोय परंतू नक्की कळत नाही कारण त्याच्यात फारच बदल झालेला दिसतोय . परंतू जेव्हा वेगवेगळ्या बॅचनुसार रांगेत उभे राहण्याची वेळ आली तेव्हा मात्र लक्षात यायला लागले . हा   तर माझा बेंचमेट आहे . ओळ

थोडा है थोडे की जरुरत है @ 16.01.24

Image
  नवे मायबाप ..( भाग २ ) मी   म्हणालो ..  तुम्ही   दोघांनी   ही   समस्या   सर्वप्रथम   समजावून   घ्यायला   हवी .  त्याआधी   ही   समस्या   आहे   हे   लक्षात   घ्यायला   हवे .  ज्याप्रमाणे   शरीराचे   छोटे   छोटे   आजार   असतात   व   त्या   आजारांकरीता   सुरुवातीला   आपण   घरघुती   इलाज   करतो .  या   घरघुती   औषधांनी   जर   सुधारणा   झाली   नाही   तर   आपण   डॉक्टरांकडे   जाऊन   त्यांचा   सल्ला   घेतो .  परंतू   याच्या   उलट   आपल्या   वागण्याच्या   किंवा   मनाच्या   काही   समस्या   असतील   तर   त्याच्याकडे   आपण   संपुर्ण   दुर्लक्ष   करतो .  दुर्दैवाने   हे   मनाचे   छोटे   छोटे   आजार   मोठे   होतात   व   त्यामुळे   व्यक्तिमत्वामधे   कायमस्वरुपी   दोष   राहून   जातो .  आपल्या   सामाजिक   चौकटीमधे   अजूनही   मनाच्या   आजारांना   हवे   त्या   पद्धतीने   समजून   घेणे   व   ते   दुरुस्त   करणे   सुरुच   झालेले   नाही . तुमच्या   मुलाच्या   मनामधे   जो   राग   उत्पन्न   होतो   व   त्याचे   ज्या   पद्धतीने   त्या   दिवशी   प्रगटीकरण   त्याने   केले   यामधे   तुम्हाला   काहीच   गैर