Posts

Showing posts from April, 2020

थोडा है थोडे की जरुरत है

Image
थोडा है ... थांबवूयात !! प्रिय वाचक बंधू भगिनी , दै . हिंदुस्थान या वृत्तपत्रात मी गेली साडे सहा वर्षे सतत हे सदर चालवितो आहे . माझा मित्र विलास मराठे याच्या आग्रहावरुन तसेच विनोद मराठे , मनिषा वहिनी आणि संपुर्ण हिंदुस्थानची टीम यांच्या पाठबळामुळे मी हे सदर गेली सहा वर्षे सतत लिहू शकलो . आजतागायत माझ्या लेखातील एकही शब्द कमी न करता किंवा त्याबद्दल आक्षेप न घेता मला माझे विचार व्यक्त करण्याची जी संधी हिंदुस्थान परीवाराने दिली त्याबद्दल आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत . या सदराच्या निमित्ताने अनेक वाचकांशी मी जोडल्या गेलो व माझा परीवार खूप मोठा झाला , अनेकांशी मैत्र निर्माण झाले . वाचकांनी दिलेल्या प्रेमाच्या ऋणातच मला रहायचे आहे . समाजमाध्यमे किंवा प्रत्यक्ष संवाद साधून मला अनेकांनी ज्या शुभेच्छा व आशिर्वाद दिले त्याने मी धन्य झालो . पुढच्या मंगळवारी थोडा है चा शेवटचा लेख मी सादर करीत आहे . त्यानंतर हे सदर थांबवूयात . पुन्हा पुढे एखाद्या नव्या वैचारिक संकल्पनेसह

थोडा है थोडे की जरुरत है @ 28.04.2020

Image
मै समय हूँ सध्या टीव्ही वर महाभारत बघत असताना परत एकदा तोच आवाज ऐकू येतो जो लहान असताना ऐकला होता . त्याच आवाजात महाभारताची पुढे जाणारी कहाणी परत एकदा ऐकण्याची संधी प्राप्त झाली . माझ्या पिढीच्या तर जवळपास प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींमधे कुठेतरी दूरदर्शनवर दाखविल्या गेलेल्या या दोन महामालिका , महाभारत आणि रामायण याचे महत्वाचे स्थान आहे . आजही त्या आठवणी मनात आहेतच त्यामुळे त्या आठवणींसह आता आपल्या मुलांना सोबत घेऊन परत एकदा महाभारत बघण्याची संधी ही फार अप्रतिम आहे . या निमीत्ताने मुलांना हमारे जमाने मे म्हणून जुन्या गोष्टी ऐकविण्याची देखील मजा येते आहे . त्यावेळी रस्ते कसे ओस पडायचे , टीव्ही काही मोजक्याच घरी असल्याने इतरांच्या घरी जाऊन टीव्ही बघणे म्हणजे काय होते , त्यांच्याकडून टीव्ही सुरु करायला वेळ झाला तर आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे कसे बघितले जायचे , टीव्ही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून कश्या प्रकारच्या सूचना दिल्या जायच्या या साऱ्या गोष्टींची उजळणी के