थोडा है थोडे की जरुरत है @ 18.12.18
आर्तता विरहाची रात्रीचा प्रहर ! नीरव शांततेचा अंमल सुरु झालेला . दूरवर कुठेतरी सहजच होणारी रातकिड्याची किर किर , ती देखील हलकेच . आसमंतात स्वच्छ परंतू गर्द निळाई पसरलेली व त्यावर चमकणाऱ्या असंख्य ताऱ्यांनी उजळून निघालेले ते प्रत्येकच माणलाला विधात्याकडून लाभलेले छत अधिकच घनगर्द दिसत होते . अर्धवट उजळलेला चंद्रमा व त्याच्यापासून काहीश्या अंतरावर असलेली , त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघणारी , त्याची असूनही त्याच्या समवेत नसलेली , विरहातही आनंद मानणारी , त्याच्या जगण्याचा आधार असूनही त्याला स्वतंत्रपणे जगायला लावणारी , परंतू त्याला तसे करायला लावून त्याच्या नकळत आसवे ढाळणारी आनंद विरहणी , ती तारका या दोघांचाच विचार मनात सुरु असताना अचानक फोनमधील प्ले लीस्टवर तो दैवी सुर उमटला , ते भावनेने ओथंबलेले शब्द झंकारले व त्याचे गाणे करणाऱ्या संगीतकाराचे वैशिष्ट्य जाणविले , अगदी नकळत ! आसमंतातील चंद्रमा व त्याची ती विरहणी तारका यांचेच जणू मनोगत व्यक्त करणारे गीत स्वरसम्राज्ञी , वन अॅन्ड ...