थोडा है थोडे की जरुरत है @ 07.05.19
अक्षय परंपरा माझ्या एका डॉक्टर मैत्रीणीच्या दवाखान्यात एका बाळाचा जन्म झाला . गेल्या वीस वर्षांपासून अमरावती शहरात प्रसुतीगृह चालविणाऱ्या एका प्रतिथयश डॉक्टरच्या दवाखान्यात एका बाळाचा जन्म होणे ही अतिशय साधी व नेहेमीचीच बाब ठरेल . परंतू आज मात्र ही नेहेमीची बाब नव्हती . या बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या जन्माबाबत एक अत्यंत अद्भूत गोष्ट समोर आली . फार अपवादात्मक स्थितीमधे असे घडू शकते अशी ती घटना होती . मला ती घटना माझ्या मैत्रीणीद्वारे कळल्यानंतर त्या घटनेबाबत तिचे अभिनंदन तर करावे वाटलेच परंतू त्यासोबत आणखी एक महत्वाचा विचार माझ्या मनात आला , तो म्हणजे विश्वासाच्या अक्षय परंपरेचा . कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असताना जेथे जेथे माणसांचा संबंध येतो अश्या कार्यांमधे इतर सर्व गोष्टींसोबतच कार्यसातत्य टिकवायचे असेल तर सर्वात श्रेष्ठ मापक म्हणजे विश्वास असते . माणूस कोणत्याही व्यक्तीशी किंवा संस्थेशी किंवा प्रतिष्ठानाशी जोडल्या जातो तो केवळ विश्वासाने . बाकी गोष्ट...