Posts

Showing posts with the label तर्कटरावांची तडजोड

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.05.18

Image
तर्कटरावांची तडजोड मला हे सारे विधी किंवा उपचार पटत नाहीत . माझ्या मनाला या साऱ्या संकल्पना रुचत नाहीत . आता आपण नव्या युगात आहोत . आपले जग झपाट्याने बदलत आहे . धार्मिक संस्कारांमधे देखील आता आपण नव्या बाबी स्विकारल्या पाहीजेत . हे जुने व पुरातन विचार आता नव्याने मांडण्याची गरज आहे . कुणीतरी याची सुरुवात करावी लागते . काळ बदलतोय आणि या बदलत्या काळासोबत आपण जर बदललो नाही तर काही दिवसात हे सारे कालबाह्य होईल . या सर्व प्रथा परंपरा यामधे जर काही तथ्य आहे असे वाटत असेल आणि काही प्रमाणात त्याची जपणूक व्हावी असे वाटत असेल तर या सर्व पद्धतींचे नवे स्वरुप जे सुदैवाने काही लोक जपण्याचा प्रयास करीत आहेत त्याचा स्विकार करायला हवा . आणि त्याहून महत्वाचे म्हणजे जी गोष्ट मनाला पटत नाही , जी गोष्ट मनाला खटकते ती केवळ हट्टापोटी मी का करायची ? माझ्या विचारांचा आपल्याला सन्मान करता येत नसेल तरी निदान मला स्वतःला विचार करण्याची मुभा मिळायला हवी . या सर्व उपचारांना चांगले ...