थोडा है थोडे की जरुरत है @ 22.08.23
सहजताच महत्वाची !! यावर्षी भारतात झालेल्या आयपीएल या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाने अगदी अंतीम टप्प्यावर गुजराथच्या संघाचा पराभव केला व यामधे चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू रविंद्र जडेजा याने अंतिम षटकामधे फारच जोरदार खेळ करून हा विजय खेचून आणला . सामना तर अप्रतिम झाला परंतू वेगवेगळ्या कारणांकरीता या सामन्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्या . संघाचा कर्णधार धोनीकरीता हा आयपीएल मधील शेवटचा सामना असावा किंवा , शेवटच्या षटकामधे धोनीने डोळे मिटून ठेवले होते वगैरे . परंतू या सोबत आणखी एका गोष्टीवर फार चर्चा झाली व त्याबद्दल मग पुढे चर्चांच्या फैरी झडल्या . मॅच संपल्यावर त्या दिवशीचा हिरो , रविंद्र जडेजा याची पत्नी सामना बघायला हजर होती . सामना संपल्यावर ती मैदानावर आली . तिने त्या दिवशी परंपरागत पद्धतीने साडी परीधान केली होती . रविंद्र जडेजा जवळ आली व तिने त्याला नमस्कार केला . ही अत्यंत सहजतेने तिने केलेली कृती अनेक लोकांकरीता अनेक दिवसांसाठी चर्चेचा विषय ब...