Posts

Showing posts with the label मन कस्तुरी रे.. जग दस्तुरी रे!!

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.10.23

Image
मन कस्तुरी रे .. जग दस्तुरी रे !! माझ्या थ्री बीएचके फ्लॅट कडे बघून आणि आतापर्यंत मी जे माझ्या प्रगतीबद्दल सांगितले ते ऐकून माझा मित्र म्हणून तुला माझ्याबद्दल निश्चितच अभिमान वाटला असेल . पण या माझ्या सोनेरी यशाला देखील एक मनाला व्यथित करणारी काळीकुट्ट किनार आहे . त्याबद्दल खरे तर मी फार बोलत नसतो परंतू तुझ्यापासून लपवू देखील शकत नाही . त्यानंतर त्याने डोळ्यातून पाणी ओघळणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करून त्याने त्याच्या आयुष्याची ती किनार माझ्यासमोर उघड केली . तो जेव्हा ते सारे बोलत होता तेव्हा माझ्या मनात त्याच ओळी उमटत होत्या .. मन कस्तुरे रे .. जग दस्तुरी रे .. माझा मुलगा एका बोर्डींग स्कुलमधे आहे . तो घरी येत नाही . म्हणजे मी त्याला येथे आणत नाही . कारण तुला सुंदर वाटणाऱ्या या घराच्या त्याच्या मनात फार चांगल्या स्मृती नाहीत . कंपनीमधे कामाला सुरुवात झाल्यावर मी प्रचंड मेहनत करायला लागलो . मी तुला सांगितल्याप्रमाणे मला तो बालपणी मनावर उमटलेला गरीबीचा डाग...