Posts

Showing posts with the label वेदना

थोडा है थोडे की जरुरत है @ 19.12.23

Image
वेदना ८१ वर्षांचे आजोबा माझ्याशी बोलत होते . मी त्या दिवशी सायंकाळी फिरायला निघालो होतो . त्यामुळे चालता चालता मी त्यांचे ऐकत होतो . माझ्या लिव्हींग वील बद्दलच्या लेखासंबंधी प्रतिक्रीया दिल्यानंतर ते मला म्हणाले की आपण मांडलेल्या संकल्पनेमुळे बऱ्यापैकी मदत होणार आहे परंतू त्याच्याही पुढे खरे तर जाण्याची गरज आहे . वैद्यकीय उपचारच नाही तर जीवनही नाकारण्याचा अधिकार असायला हवा . जीवनाची स्थिती कधी कधी अशी होऊन जाते की त्याचे ओझे होऊ लागते व त्यामुळे त्याचा देखील त्याग करण्याचा अधिकार मिळायला हवा . मी त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणालो , काका असे का बोलताय ? असे जीवन संपविण्याचे बोलू नये . ते आपल्याला एकदाच मिळते . त्यामुळे अडचणी असल्या तरी सकारात्मकतेनेच जीवनाकडे बघावे . आपले खरे आहे की कधी कधी परीस्थिती फार वाईट होऊन जाते व अश्यावेळी असे नकारात्मक विचार मनात येणे अपरीहार्य असतात . परंतू असे नका बोलू . माझे बोलणे ऐकून ते मला म्हणाले , बेटा तू माझ्या मुलाच्याच वयाचा ...