Posts

Showing posts from August, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 05.9.23

Image
संपर्क   त्या भल्या मोठ्या वास्तुसमोर लागलेली नियमावलींची पाटी मी वाचत होतो . तेथे जाताना त्या संपुर्ण परीसरात काय काय नेता येणार नाही व कश्या प्रकारे सुरक्षा तपासणी केली जाईल या सर्व बाबींची एक मोठी यादी तेथे होती . त्यांनी माझ्या जवळची बॅग काढून घेतली . त्यानंतर तपासणीकरीता माझे पैश्याचे पाकीट काढून घेतले . बेल्ट काढून घेतला . खाण्याचे कोणतेही पदार्थ , एवढेच काय पण पाण्याची छोटीशी बाटली देखील त्यांनी आत नेण्यास मनाई केली . आतमधे पिण्याच्या पाण्याची भरपूर व्यवस्था व खाण्याकरीता देखील व्यवस्था आहे असे ते सुरक्षाकर्मी सांगत होते . त्यानंतर त्यांनी माझ्या हातातील स्मार्टवॉच देखील काढूत तेथील लॉकरमधे ठेवायला लावले . परंतू सर्वात मोठी समस्या आली जेव्हा त्यांनी मला मोबाईल फोन देखील लॉकरमधे जमा करायला लावला . विमानामधे बसताना मोबाईल फोन स्कॅन करून तो परत देतात . परंतू येथे तो सोबतच न्यायचा नाही म्हणल्यावर मी एक क्षण थबकलो . त्या भव्य परीसराचा फेरफटका मारायला एकूण चार त

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.08.23

Image
सहजताच महत्वाची !! यावर्षी भारतात झालेल्या आयपीएल या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाने अगदी अंतीम टप्प्यावर गुजराथच्या संघाचा पराभव केला व यामधे चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू रविंद्र जडेजा याने अंतिम षटकामधे फारच जोरदार खेळ करून हा विजय खेचून आणला . सामना तर अप्रतिम झाला परंतू वेगवेगळ्या कारणांकरीता या सामन्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्या . संघाचा कर्णधार धोनीकरीता हा आयपीएल मधील शेवटचा सामना असावा किंवा , शेवटच्या षटकामधे धोनीने डोळे मिटून ठेवले होते वगैरे . परंतू या सोबत आणखी एका गोष्टीवर फार चर्चा झाली व त्याबद्दल मग पुढे चर्चांच्या फैरी झडल्या . मॅच संपल्यावर त्या दिवशीचा हिरो , रविंद्र जडेजा याची पत्नी सामना बघायला हजर होती . सामना संपल्यावर ती मैदानावर आली . तिने त्या दिवशी परंपरागत पद्धतीने साडी परीधान केली होती . रविंद्र जडेजा जवळ आली व तिने त्याला नमस्कार केला . ही अत्यंत सहजतेने तिने केलेली कृती अनेक लोकांकरीता अनेक दिवसांसाठी चर्चेचा विषय ब