Posts

Showing posts from August, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @28.08.18

Image
बिन कामाचा डबा आपले घर आता जुने झाले . आता याचे नुतनीकरण करायला हवे असा विचार सुनबाईंनी मांडला . अगदी खरे होते तिचे . घरामधे आवश्यक त्या सोयी नव्हत्या . त्या असुविधांमुळे कामे वाढायची . त्रास व्हायचा . परंतू मला त्रास होतो आहे हे पटवून द्यायलाही सुनबाईला बरेच कष्ट घ्यावे लागले . सासुबाई तश्याच स्थितीत अनेक वर्षांपासून असल्याने व आधीच्या पिढीच्या असल्याने सारे काही जुळवून घ्यावे हीच त्यांच्या जीवनाची पद्धत होती . इतर मंडळी जास्त वेळ घराबाहेर असल्याने घरातील असुविधांमुळे होणारे त्रास त्यांनाकळत नव्हते . त्यामुळे घराच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव पुढे सरकतच नव्हता . नव्या युगात वावरणाऱ्या सुनेला वाटत होते की आपले घर सुंदर असावे , त्याच सर्व मुलभूत सुविधा असाव्यात व त्यासाठी तिचा खटाटोप सुरु होता . बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला त्यामधे यश मिळले . यामधे सासऱ्यांनी तिची मदत केली . त्यांनी तिचे म्हणणे बरोबर आहे असा विचार मांडला व त्यानंतर चक्रे फिरली . घराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय झ