थोडा है थोडे की जरुरत है@14.08.18

एफ-

दोघांचे मोठे भांडण झाले होते. तू असे कसे काय बोललास? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू सोडून कुणीही असे बोलले असते तर मी ते ऐकून घेतले असते किंबहुना घेतेच. त्यांच्या बोलण्याची मला आता सवय झालीय. परंतू तुझ्याकडून असले बोलणे मी सहनच करु शकत नाही. कारण तू असा कधीच बोलत नाहीस. माझ्या मनाला सर्वात जास्त जपणारा तू, मला सांभाळणारा तू, माझे सर्व काही तूच आणि तू असे बोलावे? आज तू जे बोललास त्यापेक्षा जास्त वाईट बोल मी इतरांकडून ऐकलेय परंतू ते सारे मी सहन करते. तूझ्याकडून मात्र नाही. मला आज फार फार वाईट वाटलंय. रडत होती मी गेले दोन तास. वगैरे वगैरे ताड ताड ती बोलत होती आणि तो ऐकत होता. राग फार आल्याने तिने तो सारा त्याच्यावर काढला. त्याला ठाऊक होते की तिला तरी कोण होते त्याच्याशिवाय असा राग काढायला? रडत रडत आणि रागवून बोलणे झाल्यावर ती जराशी शांत झाली. त्यानंतर तो म्हणाला, आता मी सांगू का? तुला जसे वाटले तसे मला म्हणायचे नव्हते. मी असे कसे म्हणीन? तू मला जे सांगितले त्यावरुन मला एकदम तुझी काळजी वाटून गेली. तुला जसे वाटले ते अजिबात खरे नाही. मी आता तुझ्याबाबत कधीच असुरक्षित होऊ शकत नाही. तु माझ्या आयुष्याचा असा भाग आहेस जो आता विलग होऊ शकत नाही. परंतू तू जे मला सांगितलेस त्यामुळे मला तुझी काळजी वाटली. मला जगाचा तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव आहे त्यामुळे तुला या प्रकारामुळे  काही समस्या होऊ नये म्हणून मी तुला तसे म्हणालो. तुझे आपले काहीतरीच! आता त्याचा आवाज वाढला होता. माझ्याबद्दल कसा काय गैरसमज करतेस? एका बाजूने मला तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणायचे आणि सर्वात जास्त गैरसमज माझ्याबद्दलच करायचे. हे बरोबर आहे का? अकारण त्रास करुन घ्यायचा आणि मलाही द्यायचा. मला देखील तुझे हे वागणे अजिबात आवडलेले नाही. मला देखील खूप वाईट वाटले. वगैरे वगैरे तो देखील ताड ताड बोलत होता. साधारणपणे अनेक ठिकाणी, अनेक लोकांमधे आणि अनेक वेळा होणाऱ्या भांडणासारखेच हे एक भांडण होते. एकमेकांवर खूप प्रेम करीत असल्याने स्वाभाविकपणे खूप अपेक्षा असतात आणि त्यात काही वावगे नसते. निरपेक्ष राहून एकमेकांपासून वाटेल तेव्हा दूर होता आले पाहिजे या व्यवहारीकतेपेक्षा एकमेकांच्या अपेक्षापूर्तीसाठी मनापासून प्रयत्न करुन वेगळे होण्याची कल्पनाही सहन होता एकमेकांशी जोडलेले असणे जास्त बरे असे वाटते. महत्वाचा मुद्दा असा आहे की असे भांडण झाल्यानंतर त्याचे पुढे काय होते. त्या संदर्भात मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रीया आणि वागणूक बघायला मिळते. कधी कधी भांडणारे एकमेकांशी अबोला धरतात मग पहिले कुणी बोलायचे हा इगो मनामधे बाळगून तो अबोला अनेक दिवस सुरु राहतो. अबोला प्रत्येक भांडणानंतर वाढत जातो आणि दुर्दैवाने कधी कधी त्या अबोल्याची सवय होऊन जाते मग संवाद आणि नाते दोन्ही एकाच वेळी संपतात. काही वेळा ही असली भांडणे किंवा त्या भांडणांच्या रागामधे बोलल्या गेलेले बोल भविष्यात एकमेकांच्या विरोधात वापरण्यासाठी मनात जपून ठेवले जातात. परमेश्वराने दिलेले स्मरणशक्तीचे वरदान  असल्या कामासाठी वापरले जाते. वाक्ये लक्षात ठेवायची पुढल्या भांडणाच्या वेळी त्याचा वापर करुन जिंकायचे. जिंकायचे? हो! या असल्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तींमधेही जिंकल्याची किंवा हरविल्याची भावना निर्माण होते. अत्यंत जवळच्या नात्यांमधे देखील हे असले इगो बाळगले जातात भांडणांची धग कायम ठेवली जाते. परंतू वर वर्णन केलेल्या भांडणातील दोघांनी मात्र भांडणानंतर सारे काही पुन्हा पुर्ववत करण्याचा एक अप्रतिम मार्ग शोधला. ज्यामधे इगो दुखावणार नाही, फार माफी वगैरे मागण्याचे औपचारिक प्रकार राहणार नाहीत, परंतू दोघांमधील तणाव लगेच दूर होऊन नात्याची वीण घट्ट मजबूत राहील. असा एक अफलातून उपाय त्या दोघांनी शोधला होता

भांडण झाल्यानंतर थोड्या वेळाने दोघांनाही आपण विनाकारण भांडलो अशी भावना मनात येतेच. परंतू बरेच वेळा माझेच कसे बरोबर होते असे पटविण्याच्या नादात भांडण मिटतच नाही. परंतू या दोघांनी ठरविले होते की भांडण आटोपून काही वेळ गेला की मन शांत झाल्या झाल्या एकमेकांना एका शब्दात सांगायचे, एफ- करुयात? आणि असे म्हणल्यावर समोरच्याने त्वरीत हो, एफ- करुयात असे म्हणायचे. यावेळी देखील त्या दोघांनी मिळून एफ- केले आणि काही अवधीतच भांडण संपुर्णपणे संपून आणि विसरुन ती दोघे पुन्हा प्रेमाने एकत्र आलीत. पुन्हा मजेत संवाद सुरु झाला जणू काही काहीच झाले नव्हते. अशी जादु आहे ती एफ- ची

संगणकाचे ज्ञान ज्यांना आहे त्यांना ही जादू लक्षात आली असणारच परंतू परत समजून घ्यायला हरकत नाही. संगणक हे यंत्र एका वेळी अनेक गोष्टी करण्यामधे तरबेज असते. त्याला मल्टीटास्कींग कपॅसीटी असे म्हणतात. कधी कधी खूप सारी कामे एका वेळी सुरु झाली की संगणकाचा वेग जरा मंदावतो. आणखी कामे वाढली की मग शेवटी त्या यंत्रावर ताण येतो ते सारीच कामे थांबवून टाकते. कोणतेही काम पुढे सरकत नाही. या स्थितीला संगणक हँग होणे असे म्हणतात. आपण देत असलेले संदेश संगणकाच्या मुख्य प्रक्रीया करणाऱ्या व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. अश्यावेळी सारे काही नीट करण्याचा एकच पर्याय असतो तो म्हणजे संगणकाला नियंत्रीत करणाऱ्या की-बोर्ड वरील एफ- हे बटन दाबणे ज्याला रीफ्रेश करणे असे म्हणतात. हे बटन दाबल्यावर सारी अडकलेली कामे सुरळीत होऊ लागतात. आपले संदेश संगणकाकडे योग्य रितीने पोहोचू लागतात सारे काही सुरळीत मूळ पद्धतीने सुरू होते. ही किमया असते त्या एफ- या बटनाची

आपल्या व्यक्तीगत आयुष्यात जेव्हा आपले कुणाशी भांडण होते, वाद होतो तेव्हा नेमके संगणक जसे हँग होते तशीच स्थिती आपल्या मनाची मेंदुची झालेली असते. आपल्या मनाकडून जाणारे संवेदनशीलतेचे किंवा समजुतदारीचे संदेश मेंदुपर्यंत पोहोचतच नाहीत कारण भांडणामुळे प्रकट झालेल्या इगोच्या भिंती त्यांना पुढे सरकूच देत नाहीत. यामुळे सारासार विचार क्षमता हँग होऊन बसते भांडण झाल्यावरही त्याचा परीणाम आणि विरोधाची तीव्रता कायम राहते. पण अश्यावेळी जर ठरवून दोघांनीही मनाचा एफ- करण्याचे कबूल केले तर! तर खरोखरीच कमाल होईल. मनाचा मेंदुचा अडकून पडलेला संवाद योग्य पद्धतीने होऊ शकेल त्यामुळे एकमेकांबद्दल अकारण इगो निर्माण होता किंवा मीच का प्रत्येकवेळी पडते घ्यायचे असा वृथा अहंकार निर्माण होता, संवाद होऊ शकेल भांडणा दरम्यान निर्माण झालेली कटुता लगोलग नाहीशी होऊन त्यामुळे झाकोळल्या गेलेले प्रेम पुनर्स्थापित होऊ शकेल

भांडणे त्यातील कडवट विचार मनात फार जपून ठेवल्यामुळे अक्षरशः नातीच संपून गेल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. कुणाचाही इगो हा नात्यापेक्षा मोठा राहू शकत नाही हे जर लक्षात घेतले तर मग आपल्यालाही अशीच जादू करता येईल. मग भांडणे किंवा वादविवाद कितीही होऊ देत, ती संपल्यावर त्वरीत एफ- ची प्रक्रीया आपल्याला करता येईल आणि त्यामुळे अनमोल नाती सहज जपता येतील. आपल्या ह्रदयस्थ असलेल्या व्यक्तींना एखाद्या भांडणामुळे गमावण्यापेक्षा आपल्याला एफ- ची जादू करुन त्यांना आपल्या मनाशी घट्ट बांधून ठेवणे कधीही उत्तमच! होय ना?




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18