थोडा है थोडे की जरुरत है @ 21.04.20
लम्हे की दास्ताँ माझ्या मैत्रीणीला , समय का ये पल थमसा गया है , असे वाटत असताना मला मात्र गुलजार आठवले . इक बार वक्त से लम्हा गिरा कहीं , वहाँ दास्ताँ मिली लम्हा कही नही . याच ओळीच्या आधारे माझ्या मैत्रिणीला तिच्या मनातील संभ्रमांबाबत उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला . मी तिला सांगितले , हा जो काळ जणू थांबून गेलाय असे तुला वाटते हा आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील एक विशेष भाग आहे या दृष्टीने सर्वप्रथम याकडे बघणे सुरु कर . गुलजार म्हणतात त्याप्रमाणे या क्षणांची दास्ताँ आपल्याला करता आली पाहिजे . तिचा स्वाभाविक प्रश्न , म्हणजे काय ? मी सांगतो , ऐक . आपले आयुष्य आपण जगत असतो आणि त्याची एक चौकट ठरलेली असते . साधारणपणे तश्याच चौकटीत आपण वारंवार जगून ती चौकट घट्ट होत असते . प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असते . म्हणजे यात गरीब किंवा श्रीमंत असा भाग नसतो . उदाहरण द्यायचे झाले तर , एखाद्या चाळीत राहणारी एखादी व्यक्ती गर्दीच्या , गजबज असलेल्या किंवा सोयी सुविधा नसलेल्या ठिका...