Posts

Showing posts from March, 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 31.03.2020

Image
३१ मार्च ३१ मार्च २०१९ , या दिवशी दोन मित्रांचे दोन वेगवेगळ्या कामाकरीता आलेले फोन मला आज सहजच आठवले . पहिला फोन आला होता रात्री १० . ३० च्या सुमारास . एका आर्थिक क्षेत्रातील कंपनीमधे काम करणारा माझा मित्र माझ्याशी बोलत होता . त्याने लिहीलेल्या काही गोष्टी त्याला इंग्रजीमधे भाषांतरीत करुन हव्या होत्या . त्याचे काम मी करुन दिले . पण न राहवून विचारले , इतक्या रात्री तुझे काय सुरु आहे ? तो म्हणाला , तुला काय सांगू माझे काय सुरु आहे ते ? आम्ही सर्वजण ऑफीसमधे बसलेलो आहोत . आज इयर एंडींगची कामे सुरु आहेत . आमचेच काय पण आमच्याशी संबंधित सारी कार्यालये सुरुच आहेत . आज आम्ही सर्वांकरीता जेवणाची व्यवस्था येथेच केलीय . आज रात्री कितीही वाजले तरी काम पूर्ण झालेच पाहिजे असे आदेश आहेत . पैसे का काम है यार . लोकांचा पैश्याचा व्यवस्थित विनीयोग झाला पाहिजे ना ! नाहीतर कसे व्हावे ? लोकांना पैसा कसा सांभाळायचा , कसा गुंतवायचा आणि नफा कसा मिळवायचा याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो आणि या