Posts

Showing posts from March, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
एकटी दिवसभराची सगळी धावपळ करताना मला काही नाही वाटत परंतू सायंकाळ झाली की मन खिन्न व्हायला लागतं. उगाचच हुरहुर वाढते. दिवसभराच्या कामांमधे लोकांसोबत वावरत असताना आठवणही येत नाही. परंतू दिवेलागणीच्यावेळी मात्र हमखास आठवण येते. सायंकाळी घरात कुणीच नसतं. मोठा मुलगा तर त्याच्या नोकरीच्या निमित्ताने परगावीच आहे. लहान मुलगा त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. देवापुढे दिवा लावून झाल्यावर दिवाणखान्यातील त्या फोटोसमोर उदबत्ती लावताना मात्र डोळे पाणावतात. मग त्या फोटोशीच बोलते आणि एक प्रश्न रोज नित्य नियमाने विचारते, मला एकटीला सोडून पुढे का निघून गेलात? अश्या प्रकारे जाण्याचे काय वय होते का तुमचे? चाळीसाव्या वर्षी माझ्या पदरी दोन लहान लहान मुले, आमच्या चरीतार्थाला लागणारी गुंतवणूक आणि हे घर सोपवून तुम्ही निघून गेलात.. या मोठ्या घरात सायंकाळच्या वेळी एकटे बसून रोज हे विचार माझ्या मनात येतात. हे असताना कशी असायची संध्याकाळ माझी... झर्रकन् मन भूतकाळात गेले. सायंकाळ म्हणजे धावपळीचा काळ. साहेब आता थोड्याच वेळात कार्यालयातून घरी येणार. त्यांच्या आधी मुले येणार. घराच्या फाटकापासूनच आईच्या नाव

Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
फिनीक्स...परत उडण्याच्या तयारीत ग्रीक पुराणांमधे फिनीक्स नावाच्या पक्षाचे एक वेगळे महत्व आहे. हा पक्षी सूर्याशी संबंधित मानलेला असून आयुष्याच्या शेवटी मानवाप्रमाणे त्याच्या देहाची राख होते असा संदर्भ दिल्या जातो. परंतू मानवाच्या शरीराप्रमाणे त्याची राख होत असली तरी देखील त्या राखेतून नवा फिनीक्स पक्षी जन्माला येतो व तो परत गगन भरारी घेतो. अश्या प्रकारे राखेतून जन्म घेणारा व दुर्दम्य आशावादाचे प्रतिक मानल्या गेलेला हा एक अद्भूत पक्षी आहे. हा संदर्भ काल्पनिक असला तरी ग्रीक साहित्याचा प्रभाव असलेल्या इंग्रजी साहित्यामधे बरेच वेळा काही विशिष्ट माणसांच्या बाबतीत तो वापरला जातो. ज्या व्यक्तीचे आयुष्य काही कारणांमुळे किंवा विपरीत परीस्थितीमुळे विपन्नावस्थेला पोहोचते व ज्या व्यक्तीच्या जीवनाची पार धुळधाण होते अश्या व्यक्तीने त्याच्यावर ओढावलेल्या संकटापुढे डगमगून न जाता परत नवी उभारी घेऊन आयुष्यात उत्तुंग यश प्राप्त केल्यास त्याने फिनीक्स पक्षागत जन्म घेऊन उड्डाण केले असे म्हणतात. जिवनातील संकटांवर मात करुन पुढे सरसावणारी अशी जिगरबाज माणसे जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला

Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
माणूस नावाचा हिंस्त्र पशू ते सगळे माझ्यावर तुटून पडले. सुरुवातीला मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. एका दोघांना इजा देखील केली पण त्यांच्या संख्येपुढे आणि शस्रांपुढे माझा टिकाव लागला नाही. मी समोर बघत असताना माझ्या पाठीवर एका माणसाने घाव केला. त्याच्या हातातला अणकुचीदार भाला त्याने माझ्या पाठीत घुसविला होता. मरणप्राय वेदना मला झाल्या. मी वळून त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच एका माणसाच्या हातातला मोठा दगड माझ्या कपाळावर येऊन आदळला. माझे कपाळ फुटले, रक्ताची धारच लागली. त्या दगडाच्या हल्ल्याने माझा प्रतिकार जरा कमी झाला. हे बघताच लोकांचे ते कोंडाळे हातातील सर्व शस्त्रे घेऊन माझ्या आणखी जवळ यायला लागले. मी आता स्वतःला वाचविण्याच्या पवित्र्यात आली होती. या लोकांना चुकवून आणि जमेल तेथून उडी मारुन पळून जाण्याची संधी मी शोधत होती. परंतू या सर्व लोकांनी माझ्याभोवती वर्तुळच केले होते. त्यातच आणखी वाईट म्हणजे तीन चार लोकांच्या हाती लांब काडीला बांधलेले आगीचे पलीते होते. त्यांनी ते मला आता चटके द्यायला लागले. माझा धीर खचायला लागला होता. माझी बाळे माझी वाट बघत होती. खरे तर त्यांच्याच

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
"बुध"वासी महिला, "मंगळ"वासी पुरुष "आम्हा बायकांचे असेच असते, आम्ही असाच विचार करतो. पुरुषांनी त्याला नावे ठेवावी, त्याची टिंगल करावी किंवा त्यावर जोक्स बनवून व्हाॅट्स ॲपवर पाठवावेत.. आम्ही आहोत अशाच आहोत. परंतू आमच्या या स्वभावाबद्दल आता आम्हाला न्यूनगंड वाटत नाही. वाहिन्यांवरील जशी 'मेन वील बी मेन' ही जाहीरात पुरुषांना आवडते व पुरुष मंडळी त्यावर हळूच माना डोलावतात त्याचप्रमाणे आमच्या स्वभावातील हे वेगळेपण आम्ही आता सकारात्मकतेने स्विकारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आमचे हे वेगळेपण आमच्या मनात एक 'कमतरता' म्हणून जाणवून दिल्या जायचे. परंतू या पुरुषांच्या बरोबरी करण्याच्या शर्यतीमधे स्वतःची कायम पुरुषांसोबत तुलना करण्याची वाईट खोड आम्हाला लागली. काही बाबतीत ती बरोबरी होऊ शकतच नाही कारण नैसर्गिकरित्या आम्हाला परमेश्वराने वेगळे बनविलेले आहे. परंतू या शर्यतीची एकच बाजू कायम आम्ही विचारात घेतली. पुरुषांची बरोबरी करायची व ती करु न शकल्यावर न्यूनगंडाला सामोरी जायचे. परंतू याच प्रकारची एक वेगळी शर्यत देखील आहे हा विचार आमच्या मनातच आला नाही. अश्या अ

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
बालकमंदीर ते प्ले-स्कुल नुकतेच नागपूरला माझ्या भावाच्या मुलाचा एका प्ले-स्कुल मधे प्रवेश झाला. (म्हणजे ॲडमिशन झाली) ही सारी प्रक्रीया मोठी मजेदार होती. त्या प्ले-स्कुलमधे प्रवेशासाठी सर्वप्रथम वेगवेगळे फॉर्मस भरुन घेण्यात आले. यामधे मुलाची व आई वडीलांची संपुर्ण माहिती म्हणजे अगदी आधार कार्ड नंबर पासून तो पॅन नंबर पर्यंत सर्व माहिती भरुन सादर करण्यात आली. या सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतर, आई वडीलांच्या माहितीच्या आधारे, त्यांच्या मुलास त्या प्ले-स्कुलमधे प्रवेशासाठी पात्र समजण्यात आले. त्यानंतर त्याला मुलाखतीसाठी वेळ देण्यात आला. त्याच्या मुलाखतीसोबत पालकांची देखील मुलाखत घेण्यात येईल असे सांगितले. या मुलाखतीच्या तयारीसाठी साधारण पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आला. या पंधरा दिवसात त्या बाळाची तयारी सुरु झाली. ती देखील सारी गंमत होती. त्याला नाव विचारल्यावर तो स्वतःचे नाव डोरेमॉन सांगायचा. त्यानंतर तर त्याने त्यात बदल करुन बाहुबली सांगणे सुरु केले. त्याच्या आई वडीलांनी ठेवलेले छान अबीर हे नाव काही केल्या तो सांगेना. कसेबसे दहा दिवसांनंतर त्याचा मुड असला तेव्हा तो नाव सांगे. अश्या सर्व बा