थोडा है थोडे की जरुरत है @ 10.03.2020
धुयमाती तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . एका रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मी महाविद्यालयात पोहोचलो तेव्हा ग्रामीण भागातला एक सद्गृहस्थ मला भेटण्यासाठी माझी वाट बघत माझ्या कार्यालयाच्या बाहेर बसला होता . माझ्या सहायक कर्मचारी भगिनीने मला सांगितले की तो माणूस सकाळी ७ वाजल्यापासून माझी वाट बघत होता . मी साधारण दहाच्या सुमारास पोहोचलो होतो . तीन तासांपासून तो मला भेटण्यासाठी थांबला होता . एकंदरीत त्याच्या कपड्यांहून अतिशय कमकुवत परिस्थीतीमधील मला तो वाटला . माझ्या समोर बसल्यावर मी त्याला काम विचारले . सुरुवातीला तो माणूस काहीच बोलला नाही . माझ्या लक्षात आलेय की त्याला भरुन आले होते व त्यामुळे त्याला बोलणे जड जात होते . मी आग्रह केला नाही . काही वेळाने कसेतरी दाटून आलेल्या स्थितीतच तो एकच वाक्य बोलला , सर आमच्या आयुष्याची काल धुयमाती झाली आणि त्यानंतर तो माणूस ओक्साबोक्शी रडू लागला . तो ज्या गावातून आला होता त्या एका छोट्याश्या खेड्यात शहरांमधे साजरा केला जाणारा रंगपंचमीचा ...