Posts

Showing posts from May, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @28.05.19

शून्य सावली २५ मे च्या एका विलक्षण घटनेबद्दल मनात कुतुहल होते . आपला कायम पाठलाग करणारी , आपल्या कायम सोबत असणारी , आपल्या हालचाली प्रतिरुपात सादर करणारी आणि आपलेच प्रतिरुप असणारी आपली सावली आपल्याला सोडून जाणार होती . साधारण तीन चार दिवसाआधी वर्तमानपत्रात या खगोलशास्त्राशी निगडीत या एका विलक्षण घटनेबाबत विस्ताराने माहिती प्राप्त झाली . असे का होणार याचे शास्त्रीय कारण देखील वाचण्यात आले . परंतू एक अनामिक हुरहुर मनाला लागून राहीली होती . आपली सावली आपल्याला सोडून जाणार ! आपला एक अत्यंत महत्वाचा भाग जणू आपल्यापासून दुरावणार असे काहीसे मनात येत होते . काय होते असे त्या सावलीचे महत्व आणि ती जाणार तरी किती वेळ होती ? जास्तीत जास्त अर्धातास . परंतू तरीही ती जाणार याबद्दल मन कावरे बावरे झाले होते . का असे ? सावली म्हणजे आपलेच असे एक प्रतिरुप जे आपल्यासोबत कायम असते आणि आपण जसे आहोत तसेच ते आपल्याला आपली भूमिका दर्शवत असते . ही खरी खुरी भूमिका दर्शविणारे कदाचित दु