Posts

Showing posts from June, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 03.07.18

Image
शब्दांच्या पलीकडले .. मोबाईल फोन टेबलवर ठेवला होता . काकू पाळण्यावर बसून त्याच्याकडे एकटक बघत होत्या . त्याच्या रींगचा आवाज ऐकण्यासाठी कधी नव्हे त्या अतिशय आतूर झाल्या होत्या . काका तर सारखे टेबलसमोरुन फेऱ्या मारत होते . ते पण त्या मोबाईलच्या रींगची वाट बघत होते परंतू त्यांना ते काकूला कळू द्यायचे नव्हते . मला काही फरक पडत नाही असा आव त्यांनी आणला होता . परंतू सारखे काहीना काही कारण काढून त्या मोबाईल समोरुन जात येत होते व हळूच काकूंच्या नकळत त्याच्याकडे बघून घेत होते . काकुंना ते सारे कळत होते . परंतू आज त्या काकांची गंमत करण्याच्या अवस्थेतच नव्हत्या . एरवी काकांच्या अश्या वागण्यावर त्या त्यांची फिरकी घ्यायच्या परंतू आज त्यांना केवळ एकाच गोष्टीची आस लागली होती . मधेच त्या काकांना म्हणाल्या , अहो तो फोन सुरु आहे ना ? की बंद झाला एकदा बघता का ? काका देखील धावत आले व पटकन फोन उचलून बघितला . हो ना ! मी पण किती वेळचा विचार करतोय , सुरु आहे की नाही ? काकांच्या मना