Posts

Showing posts with the label फाडलेली अभिमानी नोट

थोडा है थोडे की जरूरत है 03.10.17

Image
फाडलेली अभिमानी नोट चंद्रकांत कुळकर्णी  या दिग्दर्शकाचा आजचा दिवस माझा नावाचा एक नितांत सुंदर चित्रपट मी बघत होतो . त्यामधे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची टीम एका रात्रीतून एक अवघड वाटणारे कार्य करण्यासाठी धडपडत असतात . हे कार्य सुरु असताना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रात्री घरी जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा बाराव्या वर्गातील मुलगा त्यांच्यावर रागविला असतो . त्याला समजावताना ते स्वीय सचिव त्याला म्हणतात , बाळा कामे तर आपण सारेच करत असतो . व्यवस्थेचा भाग म्हणून ती कामे आपल्याला करावी लागतातच . परंतू आज जे काम मी करतोय ना बेटा ते काम असे आहे की ज्याची कदाचित जन्मभर आपण वाट बघत राहतो . एखाद्यावेळीच अशी संधी आपल्याला प्राप्त होते की त्यावेळी आपण एखाद्या व्यवस्थेमधे काम करीत असल्याचे खरे पारीतोषिक प्राप्त होते आणि ते आपण ज्याच्यासाठी काम करतो त्याच्या मनापासून मिळालेल्या प्रतिसादाचे असते . तो मोबदला आपण एखाद्या पदावर आहोत म्हणून केलेल्या कामाचा नसतो तर माणूस म्हण...