Posts

Showing posts with the label काहिच नाही?...सर्वकाही!!

थोडा है थोडे की जरूरत है @ 09.01.18

Image
काहिच नाही ?… सर्व काही !! माझ्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थिनींना काही वर्षांनी भेटण्याचा योग आला की मला फार गंमत वाटते . संसारामधे गुंतलेली , घरच्या कामांमधे व्यस्त असलेली , एक दोन पोरांची आई असलेली विद्यार्थिनी समोर आली की तिचे महाविद्यालयातील वास्तव्य आठवून जाते . महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेमधे भाग घेणारी , स्नेहसंमेलनात मैत्रीणींसोबत एकत्रीतपणे बसून कोलाहल करणारी , तास बुडवून कधी सिनेमा बघायला जाणारी किंवा क्वचित प्रसंगी फार मस्ती केल्याने माझे रागावणे खाली मान घालून ऐकलेली एखादी विद्यार्थिनी घरची सारी कामे करताना , माझ्यासाठी आवर्जून काही पदार्थ करताना , परीवारातील सर्वांना माझे सर म्हणून माझी नम्रपणे ओळख करुन देताना , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते तेव्हा मला तिचे फार कौतुक वाटते . अश्याच एका विद्यार्थिनीकडे गेल्यानंतर तिला माझ्याशी बोलायला वेळच नव्हता . आपले सर घरी आले म्हणल्यावर तिची लगबग सुरु होती . फराळपाणी आटोपल्यावर ती समोर येऊन ...