Posts

Showing posts from July, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.07.19

Image
सेवा साफल्य बी . ए . च्या द्वितीय वर्षाचा वर्ग सुरु होता . इंग्रजीचे प्राध्यापक वर्गात अध्यापन करीत होते . अतिशय तल्लीन होऊन त्यांचे अध्यापन सुरु होते . मी त्या महाविद्यालयात एका वेगळ्या कामाकरीता गेलो होतो व महाविद्यालयात फेरफटका मारावा म्हणून सहजच कॅरीडोरमधून चालताना त्या वर्गाजवळ थांबलो . पावसाचे दिवस असतानाही वर्गात विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी संख्या होती . तो प्राध्यापक बंधू अध्यापनामधे एवढा तल्लीन झाला होता की आम्ही लोक बाहेर उभे आहोत हे त्याच्या लक्षातही आले नव्हते . माझ्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य होते . ते मला म्हणाले की विद्यार्थ्यांशी बोलायचेय का ? एरवी मी तशी संधी सोडत नसतो कारण विद्यार्थ्यांशी बोलणे हा फार आनंददायी भाग आहे . परंतू त्या दिवशी मी स्वतःला थांबविले . मी प्राचार्यांना म्हणालो , सर आपण येथेच काही वेळ थांबुयात . मी त्या प्राध्यापकाच्या अध्यापनाचा आस्वाद घेऊ लागलो . अमेरीकन कवी राॅबर्ट फ्राॅस्ट ची अतिशय गाजलेली स्टाॅपींग बाय द वूड्स कविता तो शिकवित