थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19
प्रेमाची पद्धत त्या दिवशी सुरेशला कार्यालयात खूप काम होते . तसे त्याच्या पदानुसार त्याची व्यस्तता फार होतीच . परंतू तो दिवस तर फारच जास्त कामाचा निघाला . सारखे काही ना काही सुरु होते . दोन तीन मिटींग्स सोबतच आणखी काही कामे त्याला करावी लागली . त्यासोबतच त्याच्या कार्यालयाकडून एक अहवाल नवी दिल्लीला पाठवायचा होता त्यामुळे तो तपासणे सुरु होते . त्यामधील दुरुस्त्या झाल्या की पुन्हा ते अंतीमतः नीट करणे अशी सर्व कामे सुरु होती . एरवी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयातून घराकडे निघणारा तो , आज साडे आठ होऊन गेले तरी काम आटोपलेले नव्हते . त्याच्या कार्यालयातील सर्वांनाच त्या कामाचे महत्व लक्षात आल्याने ते सर्वच लोक देखील थांबले होते . अखेरीस रात्री सव्वानऊ वाजता तो अहवाल अपलोड झाला आणि दिल्लीच्या कार्यलयातून तो मान्य झाला आणि सर्वांनी निःश्वास टाकला . नेहेमीप्रमाणे सुरेशने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले , त्यांना उशीरापर्यंत थांबावे लागले त्यामुळे काही गमतीदार बोलून ,...