थोडा है थोडे की जरुरत है @ 10.05.22
माझ्या मुलीचा मातृदिवस नुकताच आपण मदर्स डे साजरा केला . दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील एका ग्रुपमधे याबद्दल चर्चा सुरु होती . अमुक एका दिवशी मदर्स डे साजरा करायचा की नाही याबद्दल चर्चा रंगली होती . काही जण यास पाश्चिमात्यांच्या विचारांचे हे आपल्यावरील आक्रमण आहे अश्या पद्धतीची आक्रमक भुमिका मांडत होते तर काही जण काय हरकत आहे असा दिवस छान साजरा करायला . पहिली बाजू मांडणारे सांगत होते की आईच्या प्रेमाची अशी एका दिवसाला दखल घेण्याएवढं ते प्रेम स्वस्त आहे का ? अश्या एका दिवशी आईबद्दलच्या मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या , लिहायच्या किंवा आता फॉरवर्ड करायच्या आणि मग आईला विसरून जायचे हे बरोबर नाही . असे एका दिवशी आईच्या प्रेमाचा उदो उदो करणे चूक आहे . आपल्या सांस्कृतिक जडण घडणीत हे बसत नाही . या बोलण्यावर दुसरा समुह पेटून उठला होता . त्यांनी देखील आपली बाजू रेटून धरली होती . काय हरकत आहे पण असा एक दिवस साजरा करायला . आपण रक्षाबंधन नाही का साजरे करत ? त्या दिवशी ब...