Posts

Showing posts from April, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 25.04.23

Image
रिश्ते की उम्र नुकतेच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो असताना त्या पुस्तकावर भाष्य करताना माझे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र सहजच असे म्हणाले की , हर रिश्ते की एक उम्र होती है , हर ताल्लुक की गिनती की सांसें होती है … हे सांगून पुढेही ते छान बोलले . त्यानंतर कार्यक्रम देखील सुंदर झाला . मला देखील त्या पुस्तकावर भाष्य करून फार आनंद झाला . पण कार्यक्रम संपल्यावरही बराच वेळ माझ्या मनात ते एक वाक्य रेंगाळत राहीले . हर रिश्ते की एक उम्र होती है … आपण सर्वसाधारणपणे माणसांच्या जीवनाचा विचार करून त्याचा या जगात ठराविक काळ असतो व तो काळ देखील ठरलेला नाही असे बोलत असतो . या जीवन मृत्यूच्या दोन टोकांमधे प्रत्येकाला ठराविक काळाचे आयुष्य लाभलेले असते . ते किती असेल हे आजवर कुणालाही कळू शकलेले नाही . त्यामुळेच कदाचित माणसाच्या जीवनामधे कायम रेंगाळणारी अनिश्चितता त्याला कधी अस्वस्थ करते , कधी भयग्रस्त करते किंवा प्रसंगी निर्विकार देखील बनवते . परंतू नात्यांचे म

थोडा है थोडे की जरुरत है @ 18.04.23

Image
समाधानाची चावी .. एक प्रश्न !! माझ्या मित्राचा फोन आला व त्याने सांगितले की आम्ही बाबांची दुसरीकडे स्वतंत्र व्यवस्था करतो आहे . आता आम्ही त्यांना सोबत ठेवू शकत नाही . किती सहन करायचे यार ? काय काय नाही करत आम्ही सारेच त्यांच्यासाठी . त्यांच्या मतानुसार सारेच करतो . परंतू ते मात्र प्रत्येकाचा केवळ अपमान करतात . ते कुणाचेही ऐकूनच घेत नाहीत . कसे करावे काही सुचत नाही . त्यांच्या या असल्या वागण्यामुळे आता आम्ही सर्व वेडे व्हायचे शिल्लक आहोत . तू म्हणालास त्या प्रमाणे आम्ही त्यांच्या कलाने वागणे सुरु केले . त्यांच्यासाठी आम्ही आमचे कार्यक्रम बदलले . त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन सारे काही करतो पण हे मात्र त्यांच्या भूतकाळातून बाहेरच यायला तयार नाहीत . काहीही झाले की माझ्या काळात असे होते , माझ्या काळात तसे होते . आम्ही असे करत होतो , आम्ही तसे करत होतो . आम्ही एवढ्या वयात हे केले , ते केले . पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात कर्तृत्व गाजविले असे त्यांना वाटते त्याच्या दुप