थोडा है थोडे की जरुरत है @ 25.04.23

रिश्ते की उम्र

नुकतेच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो असताना त्या पुस्तकावर भाष्य करताना माझे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र सहजच असे म्हणाले की, हर रिश्ते की एक उम्र होती है, हर ताल्लुक की गिनती की सांसें होती हैहे सांगून पुढेही ते छान बोलले. त्यानंतर कार्यक्रम देखील सुंदर झाला. मला देखील त्या पुस्तकावर भाष्य करून फार आनंद झाला. पण कार्यक्रम संपल्यावरही बराच वेळ माझ्या मनात ते एक वाक्य रेंगाळत राहीले. हर रिश्ते की एक उम्र होती है

आपण सर्वसाधारणपणे माणसांच्या जीवनाचा विचार करून त्याचा या जगात ठराविक काळ असतो तो काळ देखील ठरलेला नाही असे बोलत असतो. या जीवन मृत्यूच्या दोन टोकांमधे प्रत्येकाला ठराविक काळाचे आयुष्य लाभलेले असते. ते किती असेल हे आजवर कुणालाही कळू शकलेले नाही. त्यामुळेच कदाचित माणसाच्या जीवनामधे कायम रेंगाळणारी अनिश्चितता त्याला कधी अस्वस्थ करते, कधी भयग्रस्त करते किंवा प्रसंगी निर्विकार देखील बनवते. परंतू नात्यांचे मात्र तसे नाही. नात्यांची सुरुवात शेवट हे दोन्हीही माणसाच्या हातात असतात. नाते निर्माण करणे, त्या नात्याचा आनंद घेणे, नात्याच्या आधारे आपले जीवन समृद्ध बनविणे, आपले मनोबल वाढविणे इत्यादी सर्व बाबी माणसाच्या हातात असतात. यासोबतच नात्यांची निवड हा देखील पर्याय माणसाच्या हातात असतो. हे जरी खरे असले की काही नाती त्याला निवडता येत नाहीत परंतू त्या नात्यांपासून तो स्वतःला सोडवू शकतो. तो पर्याय त्यांस उपलब्ध राहतो. परंतू काही नाती आपल्या आयुष्यात अशी निर्माण होतात ज्यांची आपल्याला खरोखरीच आवश्यकता असते. अशी नाती फार वेगळी नात्यांच्या नेहेमीच्या चौकटीच्या पलीकडची असतात. कधी कधी तर त्यांची योग्य पद्धतीने व्याख्या देखील करता येत नाही. कारण ही नाती कोणत्याही व्याख्या किंवा नावांच्या पलीकडची असतात. या नात्याचा मनःस्वी आधार असतो. त्यामधे निखळ प्रेम असते सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या अपेक्षापूर्तीचा आनंद असतो. अश्या नात्यामुळे आपल्याला जीवन सक्षमतेने जगण्याचे पाठबळ लाभत असते. या नात्यांमधे आणखी एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे ही नाती नेमकी कशी निर्माण झाली हे आपल्याला सांगता येत नाही. कारण सहवास, सहकार्य प्रेम या आधारावर ही नाती तयार झालेली असतात ज्यामुळे त्यात एक सहजता असते. या नात्यांचा आधार कोणतीही देवाण घेवाण किंवा लाभ नसतो. या असल्या नात्यांमधे भावनिक गुंतणूक हा सर्वात मोठा आधार असतो. अपेक्षा असतात परंतू अपेक्षापूर्तीचे ओझे नसते तर त्याचा आनंद असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी फार नाही परंतू एक दोन नेहेमीच्या चौकटीच्या पलीकडची नाती असतात.. जी सहजतेने निर्माण झालेली असतात म्हणूनच ती कायम आनंद देत राहतात. परंतू मग, हर रिश्ते की एक उम्र होती है, हा नियम या नात्यांना देखील लागू राहतो का? हा विचार माझ्या मनात राहून राहून येत होता.

हा नियम लागलेली काही नाती ज्यामधे लोक सोबत तर रहात आहेत परंतू त्यांच्यामधले नाते किंवा प्रेम संपून गेलेले आहे असे आपल्याला दिसते. त्या नात्यांची उम्र सोबत राहूनही संपलेली असते. परंतू या वेगळ्या भावनिक नात्यांचे काय? त्यांचा देखील शेवट होतो का? ही देखील नाती काळानुरुप जुनी कंटाळवाणी होतात का? या देखील नात्यांमधे तोच तो पणा येतो का? ही नाती देखील ओझी बनतात का

मला असे वाटते की या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या नात्यांना जगणाऱ्या दोघांच्या समंजस व्यवहारावर विचार प्रक्रीयेवर अवलंबून आहे. नात्यांमधे आवश्यक ती स्पेस देता येणे, एकमेकांच्या वागण्याबद्दल अजिबात संशय घेणे, एकमेकांबद्दलच्या अपेक्षापूर्तीचा हट्ट करता त्याची पूर्तता संयमानेच करणे सर्वात महत्वाचे म्हणजे सोबत राहो अथवा राहो, नात्यामधील विश्वास कधीही ढळू देणे या गुणांच्या आधारे या नात्यांची उम्र कधीही संपू शकणार नाही अन्यथाहर रिश्ते की एक उम्र होती है, हर ताल्लुक की गिनती की सांसें होती हैया ओळी प्रत्येकच नात्यात खऱ्या ठरू शकतात.



Comments

  1. Same relation ship is everlasting . It has no end and that is friend ship

    ReplyDelete
  2. ते जेव्हा तसे बोलतात म्हंजे अत्यंत व्यावहारिक पातळीवरचे विचार आहेत. ज्याच्या मध्ये भावनात्मक म्हणजे इमोशनल असे काही न च्या बरोबर.....गुंतागुंती मध्ये न फसता मार्गक्रमण करणे...इथे तात्कालिक तेला महत्व...जिथे नात्याला महत्व राहील तिथे हा प्रश्न पडत नाही...दुसऱ्या अर्थाने नाऱ्याचे वय ठरविणे ज्याच्या त्याच्या वर अवलंबून असते....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18