Posts

Showing posts with the label किंमत

थोडा है थोडे की जरुरत है @ 23.05.23

Image
किंमत पुण्याला एक दिवस मुक्काम झाल्यावर मुलीला फोन केला . ती देखील तेथेच राहत असल्याने भेट घ्यायची होती . भेटण्याचे ठिकाण वगैरे ठरल्यावर तिने मला सहजच विचारले , बाबा , तुमचा नास्ता झाला का ? मी तिला म्हणालो की नास्ताच करतो आहे . ती म्हणाली कुठे आहात तुम्ही ? मी तिला तिच्या महाविद्यालयाजवळच्याच एका हॉटेलचे नाव सांगितले . ते ऐकल्याबरोबर तिने जी प्रतिक्रिया दिली ती मला फारच छान वाटली . कारण ती प्रतिक्रीया माझ्या मुलीच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल दर्शवित होती . खरे तर बाप म्हणून मला त्याबाबत विचार केल्यावर जरा वाईट वाटले . परंतू अंतीमतः आनंद याचा झाला की काही वर्षांपूर्वी आम्ही परीवारातील सर्वांनी मिळून तिच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरला होता . तो निर्णय होता तिला बारावी झाल्यावर पुण्याला शिकायला पाठवणे . केवळ १७ वर्षांची पोर एकटी कशी राहू शकेल या प्रश्नाने आमच्या झोपा उडाल्या होत्या . परंतू निर्णय घेतला व तो निर्णय योग्य होता ही आश्वस्तता देणारी ती ...