थोडा है थोडे की जरुरत है @ 12.04.22
फोटोग्राफिक लग्न ज्यावेळी इ . स . १८०० मधे थॉमस वेगवूड याने पहिला फोटोग्राफ निर्माण केला त्यावेळी त्याने जगामधे एक प्रचंड मोठी क्रांती आणली . त्याचे कारण त्या फोटोग्राफमुळे मनावाला जगून गेलेले क्षण जपता येऊ लागले . मानवाच्या विकासाच्या दृष्टीने तो फारच महत्वपूर्ण शोध होता . तसे तर कालचक्र सर्वश्रेष्ठ असून त्याच्या गतीपुढे कुणाचेही काहीही चालत नाही . गेलेला क्षण कधी परत येत नाही . हे जरी खरे असले तरी वेगवूडच्या शोधामुळे गेलेल्या क्षणांना फोटोग्राफच्या रुपात पकडून ठेवणे व परत परत त्या क्षणांना मानसिकदृष्टीने अनुभवणे हे एक सुख आपल्या सर्वांना लाभले . खरोखरीच ही आपल्या सर्वांकरीता निघून गेलेले क्षण परत अनुभवण्याची संजिवनीच ठरली . यामुळे काही महत्वाचे क्षण कायमचे आपल्याजवळ रहायला लागले . हळू हळू या तंत्रामधे प्रगती व विकास होत गेला आणि मग त्याची विविध रुपे आपल्यासमोर येऊ लागली . एका मोठ्या कॅमेरातून काढलेले ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो , मग रंगीत फोटो , मग लग्न समारंभांचे अल्...