Posts

Showing posts from November, 2017

थोडा है थोडे की जरूरत है @28.11.17

Image
मी टू मिशन आधुनिक काळ सुरु झाला आणि त्या काळातील बदलांना आपण स्विकारुन त्यामधे स्थिरावायला लागलो . आता आधुनिकता म्हणून केलेली गोष्ट आपल्याला बावरुन टाकत नाही किंवा धक्का देत नाही . अनेक वर्षांच्या संस्कारांमुळे कदाचित आपल्याला ते स्विकारणे जरा जड जातही असेल किंवा प्रसंगी त्या बदलांबाबबत आपण टिकाही करत असू परंतू आता असे जगावेगळे बदल समाजात किंवा अगदी आपल्या आसपासही घडू शकतात अशी आपल्या सर्वांच्याच मनाची तयारी होऊ लागली आहे . माझ्या पिढीचे लोक आता सहजच येत्या दहा वर्षांनंतर आपली पोरे लग्न लावून देण्याची संधी देतात की सरळ सुनबाईला नमस्काराला आणतात हे ठाऊक नसल्याबद्दल विनोदही करु लागले आहेत . त्यामुळे वेगवेगळे सामाजिक किंवा सांस्कृतिक बदल होणार आहेत आणि ते फार वेगाने होणार आहेत याची मानसिक तयारी आपण करुन ठेवलेली आहे . हे सारे बदल होत असताना एक अत्यंत महत्वाचा बदल होतोय तो म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा . गेल्या पन्नास वर्षांपूर्वी या समाजात ज्यांना महत्वाचे स्था