Posts

Showing posts from September, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
झुकुगाडीचा आनंद माझ्या भावाने त्या दिवशी मला सांगितले की, महालक्ष्मी पुजनासाठी तो त्याच्या पत्नी व मुलांसह रेल्वेने येणार आहे व मी त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर यावे. मी त्यांना घ्यायला स्टेशनवर जाणारच होतो परंतू मला त्यांच्या या प्रवासाच्या कृतीचे आश्चर्य वाटले. कारण एरवी ते सर्व कारमधे बसून साधारण दोन सव्वा दोन तासात नागपूरहून अमरावतीला त्या घरापासून या घरापर्यंत अगदी आरामात येतात. परंतू तो आरामाचा प्रवास सोडून साधारण एक तास आधी घरुन निघून रेल्वे स्टेशनवर जायचे, त्यानंतर इंटरसीटी गाडीत बसून साधारण अडीच तासाचा प्रवास करायचा व मग रात्री मी त्यांना घरी घेऊन यायचे. या सर्व प्रकारात साधारण कारच्या प्रवासापेक्षा दुप्पट म्हणजे पास तासाचा वेळ जाणार. त्यामुळे मी त्याला सहजच विचारले की कार घेऊन का येत नाहीस. त्याने दिलेले उत्तर मला मजेदार वाटले व त्यामधून आपला देखील विचारप्रवास कसा बदलत चाललाय याची जाणीव झाली. रेल्वेप्रवासाचा हा असा द्राविडी प्राणायाम करण्याचे त्याने यासाठी ठरविले की त्याच्या चार वर्षांच्या मुलाला रेल्वेचे फार कौतुक असून त्याने आतापर्यंत रेल्वे केवळ चित्रांमधे व काहीव

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
नो म्हणजे नाहीच एखादी मुलगी जर नो म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच होतो. त्याचा अर्थ कुठल्याही प्रकारे हो असा राहू शकत नाही. मुलींच्या कपड्यावरुन त्यांचे चारीत्र्य ठरविण्याची परंपरागत समजूत या नव्या काळात आपण बदलणार आहोत की नाही? मुलीने मित्रासोबत मित्रासारखा व्यवहार केला, त्याच्यासोबत हसून बोलली किंवा त्या गप्पांच्या दरम्यान त्याला स्पर्श केला याचा अर्थ ती शारीरिक सबंधांसाठी तयारच आहे असे समजणे कितपत योग्य आहे? सामाजिक दृष्टीने स्री पुरुष समानता निर्माण झाली असा विश्वास जरी निर्माण झाला तरी देखील तो आभासच आहे कारण चारित्र्याच्या कल्पना पुरुषांसाठी वेगळ्या व स्त्रीयांसाठी वेगळ्याच आहेत. मित्रांमधे वावरणारी, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणारी, बोलताना हातावर टाळी देणारी, तिला आवडतात म्हणून जीन्स वगैरे घालणारी, मित्रांसोबत रात्रीच्या रॉक कन्सर्टला जाणारी, मित्रांसोबत प्रसंगी बीयर पिणारी मुलगी ही वाईट चारित्र्याचीच असते आणि कायम उपलब्ध असते अश्या प्रकारचा या समाजाने करुन ठेवलेला समज अजून किती दिवस आपण ओझे म्हणून सांभाळणार आहोत? बीयर पिणे हे एखाद्या महिलेसाठी चारीत्र्यहनन आहे परंतू पुरुषा

My article published in Hindusthan daily on 13.09.16 under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
चांगुलपणाची "अनपेक्षित" किंमत घटना तशी अगदीच छोटीशी होती परंतू मला जरा आश्चर्यात टाकणारी व पर्यायाने बदलत्या समाजमनाचा विचार करायला लवणारी होती.. माझ्या मुलीच्या फोनमधील सॉफ्टवेअर नादुरुस्त झाले. त्यामुळे फोन बंद पडला. ऑनलाईन केलेली खरेदी असल्याने त्याचा तसा वाली कुणीच नव्हता. परंतू तरी देखील अश्या प्रकारच्या समस्यांना सोडविणारा एक माणूस अमरावती शहरात आहे याचा मला शोध लागला. त्याच्या दुकानात गेल्यावर त्याने एका दिवसात मोबाईल फोन ठीक करुन देतो असे मला सांगितले. नेहेमीप्रमाणे त्या मोबाईल फोन मधील सीम कार्ड व मेमरी कार्ड मी काढून सोबत घेऊन आलो व फोन त्याच्या सुपुर्द करुन दिला. दुसरे दिवशी मी फोन आणण्यासाठी गेलो तेव्हा तो मुळ मालक त्या दुकानात नव्हता परंतू फोन दुरुस्त होऊन तयार होता. त्याच्या दुकानातील त्या सहायकाकडे मी पैसे दिले व फोन घेऊन घरी आलो. घरी आल्यावर त्या फोनमधील सीम कार्ड व मेमरी कार्ड लावण्यासाठी मी फोन उघडला..बघतो ते काय! त्यात एक मेमरी कार्ड लावलेले होते. माझे मेमरी कार्ड माझ्याजवळच असल्याने ते कदाचित त्या दुकानदाराने तपासणीसाठी लावलेले चुकुन त्या फोनमधेच राह

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
ढोल पथक : एक नवा आयाम गणपती बाप्पाचा सण अनेक वर्षांपासून आपण साजरा करीत आलो आहोत. लोकमान्यांनी समाजप्रबोधनाच्या व सामाजिक ऐक्याच्या हेतुने सुरु केलेल्या या एका महत्वपूर्ण उपक्रमाला गेल्या शंभर वर्षात वेगवेगळे आयाम प्राप्त होत गेले. स्वातंत्र्योत्तर काळात या उत्सवाचे रुप बदलले ज्यामधे व्याख्यानांच्या जागी आर्केस्ट्रा आला व तोही काळ बराच गाजला. दुरचित्रवाणीचा आपल्या घरात प्रवेश झाला आणि मग या उत्सवामधील कार्यक्रमांचा भाग हळूहळू कमी झाला व गेल्या दोन दशकांमधे भव्य देखावे हे या उत्सवाचे स्वरुप बनले. मोठमोठाले देखावे बनवून लोकांना आनंद देण्याचे कार्य मोठमोठ्या मंडळांनी सुरु केले. स्वाभाविकच या मंडळांमधे त्या निमित्ताने येणारी गर्दी बघून त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळायला लागले. खरे तर ही एक चांगलीच बाब झाली त्या निमित्ताने हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा होऊ लागला. रोषणाई, डीजे असले नवे प्रकार देखील यात आले परंतू त्या सोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक देखाव्यांमुळे किंवा मोठमोठाल्या मंदिरांच्या प्रतिकृतींमुळे या उत्सवाला लोकप्रीयतेचा नवा आधार तयार झाला. या माध्यमातून जनसंपर्क वाढवून राजक