Posts

Showing posts from September, 2015

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
गेट टुगेदर रीझोल्युशन यशस्वी आयुष्य जगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो कारण यशस्वी आयुष्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या देखील वेगवेगळ्या असतात. असे असले तरीदेखील जो आनंदी आयुष्य जगतो व ज्याला आयुष्याच्या विविध क्षणांमधे आनंद शोधता येतो तो यशस्वी आयुष्य जगतो असे सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येईल. अर्थात आपले आयुष्य बरेचवेळा आपल्या सभोवताली असलेल्या समुहाच्या अस्तित्वावरही अवलंबून असते. काही लोक समुहामधेही त्रयस्थ राहतात तर काही या समुहाचा उपयोग सर्वांच्या आयुष्याला अर्थ निर्माण करुन देण्यासाठी करतात. मुळात दृष्टीकोन सकारात्मक असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाला यशस्वी आयुष्याच्या दिशेने पडणाऱ्या पावलामधे परावर्तीत करता येऊ शकते. एक असाच सुंदर प्रयत्न मला बघायला मिळाला आणि तो प्रयत्न किती परीणामकारक ठरतो आहे हे देखील मला कळल्यानंतर माझा त्याबद्दलचा आनंद द्विगुणित झाला आहे. सध्या सगळीकडे शाळेतील जुन्या बॅचेसच्या रीयुनीयनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आहेत. ही एक अतिशय चांगली बाब आहे. पंचेवीस किंवा पन्नास वर्षांनतर शाळेतील सर्व सवंगडी परत एकदा एकत्र भेटणार आणि काही वर्षांपू

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
एस ओ एस कॉल साधारण वर्षभरापूर्वी मुंबईला रहात असलेल्या माझ्या एका मित्राचा मला फोन आला. तो मला म्हणाला, यार! मी तुला एक एस ओ एस कॉल करतोय. मला कळेना की त्याला नेमके काय म्हणायचे आहे. मला त्याने वापरलेली संज्ञा माहित नसल्याने मी त्याच्या पुढील बोलण्याची वाट बघितली. त्याच्या बोलण्याहून माझ्या नंतर लक्षात आले की तो अमरावतीला आलेला होता आणि त्याला माझ्याकडे एक काम होते. काम अतिशय साध्या स्वरुपाचे होते परंतू तो त्यासाठी फारच आर्जव करीत होता. मला त्याचे आर्जव करणे जरा विचित्रच वाटत होते. काम असे होते की त्याच्या घरी महालक्ष्मींचा सण असल्याने त्याला पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटर बॉटल्सवाल्याकडून तीन बॉटल्सची ऑर्डर बुक करुन हवी होती. इतक्या साध्या कामासाठी त्याने मला एस ओ एस कॉल करावा ही माझ्यासाठी फारच आश्चर्याची बाब होती. पण ज्यावेळी फोन आला त्यावेळी मला एस ओ एस कॉलची संकल्पना माहिती नव्हती. तरीदेखील मित्र म्हणून हक्काने जी गोष्ट किंवा काम त्याने सांगायला हवे होते त्यासाठी तो फारच काकुळतीला येऊन आर्जव करीत होता. त्याचे काम लगेच होऊन जाईल असे त्यास आश्वस्त करुन मी त्याची चिंता मिटविली. त

My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
अब बस सन्नाटे है ती: सकाळी ६.०० वाजता मला अलार्म वाजायच्या आतच जाग येते. पहाटेची घरातील सर्व कामे मला घाई घाईने आटपावी लागतात. नवरा झोपला असतो. आधीच्या रात्रीच्या पार्टीचा हँगओव्हर उतरायचा असतो त्याचा. मला मात्र कामे आटोपून लगोलग ऑफीसला पळायचे असते. नेमके ऑफीसमधे लवकर बोलाविले जाते. त्यांचेही बरोबर आहे, पुढच्या आठवड्यात हेड ऑफीसची टीम येणार आहे त्यामुळे कामे तर करावीच लागणार. आठ वाजेपर्यंतही नवरा उठला नसतो त्यामुळे त्याला काही सूचना देऊन निघते. नास्ता ठेवलाय टेबलवर, दुध फ्रीजमधेच आहे, चहा करुन घे, कामवाल्या बाईसाठी समोरच्या घरी किल्ली ठेवीत जा म्हणून रोजच सांगावे लागते, विसरणे किती प्रमाणात राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझा नवरा. ऑफीसच्या गोष्टी मात्र बरोबर लक्षात राहतात. स्वयंपाकाला बाईच असल्याने मला लवकर निघता येते अन्यथा ज्या दिवशी बाई नसेल त्या दिवशी काहीतरी भराभर करुन द्यावे लागते. पण मग त्या दिवशी ऑफीसमधे फोन करुन उशीरा येण्याची परवानगी घ्यावी लागते. मला ते अजिबात आवडत नाही. माझा नवरा झोपेतच मला गुड मॉर्नींग करतो आणि मी त्याचे ते शब्द ऐकण्याआधीच घराबाहेर पडलेली असते. मी क

My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
"स्कील"फुल शिक्षक नुकतेच अमरावती शहरातील एका महाविद्यालयामधे मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यानासाठी बोलाविले होते. शिक्षक दिन लागूनच असल्याने मी माझ्या व्याख्यानात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामधे शिक्षकांच्या योगदानाबद्दल बोललो. शिक्षक वेगवेगळ्या पातळीवर कश्या प्रकारे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसित करीत असतो याचे दाखले देऊन मी ती बाब स्पष्ट केली. परंतू मी बोललेल्या बाबीवर नंतर माझ्या मनात एक वेगळाच विचार सुरु झाला. कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयांमधे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे आम्ही प्राध्यापक मंडळी किंवा विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करणारे शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थ्यांना काय देतो आहे याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटायला लागले. माझ्या मनातील या प्रश्नांची फार उत्तम उत्तरे त्या महाविद्यालयाच्या अत्यंत अनुभवी व प्रयोगशील प्राचार्यांनी मला दिली. मुळात आपण जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना ज्ञान देतो आहे किंवा फार स्पष्ट बोलायचे झाल्यास माहिती देतो आहे. ही माहिती प्राप्त करण्याचे स्रोत आपल्याकडे विद्यार्थ्या

दै. हिंदुस्थानमधे प्रकाशित माझ्या थोडा है, थोडे की जरुरत है या सदरातील आजचा लेख

Image
समुपदेशन...काळाची गरज! माझ्या एका मित्राचे त्याच्या पत्नीशी अजिबात पटत नव्हते. अत्यंत छोट्या छोट्या बाबतीत ते दोघेही नेहमीच टोकाची भूमिका घ्यायचे. वाद सुरु होताना त्याचे कारण फारच क्षुल्लक असायचे परंतू त्यानंतर वादावादी वाढून त्याचे रुपांतर टोकाच्या भांडणामधे व्हायचे. या सारख्या सारख्या भांडणांमुळे त्याच्या घराची सुख शांती पार हरवून गेली होती. केवळ तीन वर्षात त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण आनंद संपून गेला होता. भांडणे तर इतकी विकोपाला गेली होती की एक एकदा दोघांनीही जवळपास आपले आयुष्य संपविण्याचा प्रयत्न देखील केला होता. सुरुवातीला त्यांची भांडणे चार भिंतींच्या आड होत असल्याने कळायचे नाही. परंतू पुढेपुढे त्यांना भेटताना त्यांच्यातील वाद आम्हाला देखील जाणवायला लागले. सारेच अवघड होऊन बसले होते. दोघांच्या परीवाराच्या मंडळींनी देखील त्यांना समजावून सांगितले होते. परंतू काही दिवस संसाराचा गाडा ताळ्यावर राहून परत ये रे माझ्या मागल्या असे त्यांचे व्हायचे. त्याच्या संसाराचा झालेला खेळ खंडोबा मला बघवतच नव्हता. शेवटी मी एकदा मनाशी पक्के ठरवून त्यांच्याकडे गेलो. दोघेही तणावातच होते. कदाचित त्यांचे