Posts

Showing posts with the label Article about film नटसम्राट

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
तुफानाची तेजःपुंज शोकांतिका कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का घर? आयुष्याच्या चौरसावर सारं काही गमावून बसलेले असहाय नटसम्राट गणपतराव बेलवलकर विचारीत असतात हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचा प्रत्येक शब्द व त्या प्रत्येक शब्दासोबत निर्माण होणारी वेदना आपले काळीज खोलवर जाळीत जाते. गणपतरावांची ही आर्त हाक आपल्या डोळ्याच्या कडा पाणावते व त्यासोबतच आपण सामील होतो एका शोकान्तिकेच्या प्रवासात. नटसम्राट - आणखी एक नाटक चित्रपट रुपाने आपल्यासमोर अवतरलंय. काही महिन्यांपूर्वी सुरांची कट्यार चित्रपटाच्या रुपाने सुबोध भावेंनी आपल्या ह्रदयात वसविली. आता महेश मांजरेकरांनी नटसम्राटची शोकान्तिका आपल्या अनुभवाला आणली, भव्य सेल्युलॉईडवर. नाटकाच्या रंगमंचाला असलेल्या मर्यादा येथे नाहीत, सेटची देखील ठराविक चौकट नाही. सोबत आपल्या दमदार अभिनयांनी व्यक्तिरेखा जिवंत करुन त्यात प्राण ओतणारे दिग्गज कलाकार यात आहेत. मुळात वि.वा. शिरवाडकरांच्या भाषेचा बाजही जवळपास तसाच जोपासला आहे त्यामुळे नटसम्राट हा चित्रपट बघणे म्हणजे अभिजात साहित्य, दर्जेदार अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन याच्या त्रिवेणी संगमाचा लाभ घेण...