Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 05.02.24

Image
पॉज .. तू अचानक गावाकडे कशी आलीस ? एवढ्या दिवसांनंतर कशी काय गावाची आठवण आली तुला ? तिच्या बालपणीचा मित्र तिला विचारतो . चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा शॉट अप्रतिम पोझीशनवर घेतलाय . दोघेही आकाशपाळण्यात बसलेले असतात आणि तो पाळणा हे दोघे वर असताना थांबलेला असतो . गरगर फिरणारा , घाबरवणारा , मनात धडकी भरविणारा , पोटात गोळा आणणारा , आनंद देणारा , एक्साईटमेंट देणारा असा तो पाळणा थांबलेला असतो व ती त्याला तिच्या गावाकडे परतण्याचे कारण सांगत असते .  थ्री ऑफ अस नावाच्या एका आर्ट फिल्म मधील मी वर्णन केलेला हा एक अप्रतिम सीन व त्यामधे सांगितले जाणारे एक जीवनसत्य . दहावीच्या शिक्षणानंतर गाव सोडून शहरात गेलेली ती , नोकरीतील निवृत्तीच्या जवळ पोहोचताना आपल्या नवऱ्यासोबत परत एकदा गावात येते . गावातल्या तिच्या बालपणाला पुन्हा एकदा भरभरून कवटाळण्यासाठी , पुन्हा गावातील शुद्ध हवेमधे मोकळा श्वास घेण्यासाठी , स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र वाळूमधे चालण्यासाठी , गाव सुटल्यापासून आयुष्यातून पार स

थोडा है थोडे की जरुरत है @ 27.02.23

Image
बाबांचा पगार झाला नाही … आर्थिक नियोजन ही बाब सध्याच्या काळात एवढी महत्वाची आहे की त्याची सवय आपल्या मुलांना फार लवकर लावणे ही काळाची गरज आहे असेच म्हणावे लागेल . आपल्याला मिळणारा पैसा योग्य रीतीने व जपून कसा वापरायचा याचे प्रशिक्षण मुलांना देणे फार गरजेचे आहे . काही पालकांचा या बाबत जरा वेगळा दृष्टीकोन असतो . वरकरणी व भावनिकदृष्ट्या ते योग्य वाटत असले तरी देखील त्याचे दूरगामी परीणाम फार योग्य नसतात . काही पालकांचे म्हणणे असते की त्यांच्या लहानपणी त्यांना आर्थिक सबळता नव्हती व त्यामुळे फार गरीबीत दिवस काढावे लागले . परंतू आता सुदैवाने परीस्थिती सुधारल्यामुळे मी जे भोगले ते माझ्या मुलांना भोगण्याची पाळी यायला नको . म्हणून दर महिन्याला हजारो रुपये वापरण्याची क्षमता असलेले क्रेडीट कार्ड त्यांनी मुला मुलींना दिलेले असते . क्रेडीट कार्ड वापरून फटाफट खरेदी करताना त्या तरुण मुलाला किंवा मुलीला त्या पैश्याचे मोल कळलेले नसते व परीणामतः त्यांना अडचण म्हणजे काय किंवा