Posts

Showing posts with the label नवी भाषा आलीय...

थोडा है थोडे की जरुरत है@16.10.18

Image
नवी भाषा आलीय .. माझ्या आचार्य पदवीच्या अभ्यासादरम्यानची गोष्ट . माझे मार्गदर्शक परतवाड्याच्या जगदंबा महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ . जनार्दन कुरुप हे मुळचे केरळातील कायनकुलम या गावाचे रहिवाशी होते . मी त्यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवीचा अभ्यास करण्याचे ठरविले परंतू सुरुवातीच्या दोन वर्षांमधे माझा काही कारणांमुळे अभ्यास होऊ शकला नाही . दरम्यान माझे मार्गदर्शक डॉ . कुरुप यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला . मार्गदर्शक बदलवायचे नव्हतेच त्यामुळे मी त्यांच्या केरळातील गावाला जाऊन आचार्य पदवीचा अभ्यास करण्याचे ठरविले . मी मधून मधून त्यांच्या गावी जायचो . अत्यंत सह्रदयी असलेले माझे मार्गदर्शक मला त्यांच्या घरीच थांबवून घ्यायचे . परंतू कधी कधी मी जरा आसपास भटकायला जायचो . तसे ते कायानकुलम नावाचे गाव छोटेच होते . एकदा मी रात्रीच्या वेळी एका छोट्याश्या बस स्टॉपवर उभा होतो व एका ठिकाणाहून मला परत घरी यायचे होते . अडचण अशी झाली की माझ्...