Posts

Showing posts from September, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @07.09.21

Image
फक्त मी … क्षण !! त्या परीसरातले ते शेवटचे गाव . त्याच्या पुढे काहीच नाही . पुढे फक्त जंगल , दऱ्या नि डोंगर . त्या गावाला पोहोचताना गाडीने शेवटचा टर्न घेतला आणि आमच्या समुहातील प्रत्येकाच्या मोबाईल ची रेंज गेली . ज्या जगातून आम्ही सारे आलो होतो , जेथे अनेक लोक ओळखीचे होते , जेथे काम करत होतो , दिवसभर कष्ट करून वेगवेगळ्या व्यवस्थांमधे गुंतलो होतो , जेथे वेगवेगळे कार्यक्रम होत होते , वेगवेगळ्या सभांमधे विविध विषयांवर चर्चा होत होत्या , हे सारे करताना वेगवेगळे लोक सोबत होते , वेगवेगळ्या कामांकरीता भेटायला येत होते , आपल्या कामाचे मुल्यमापन करणारे होते , आपल्या कामाची प्रशंसा करणारे होते , टिका करणारे होते , कुणी सोबत होते , कुणी सोबत असून सोबत नव्हते , कुणी सोबत आहोत असे दाखवत होते , वेगवेगळ्या प्रकारची कामे होती , मेसेजेस होते , त्यामधे वेगवेगळे विचार होते , परीपत्रके होती , त्याचे वेगवेगळे अर्थ होते , अनेक फॉरवर्ड केलेले संदेश होते , न वाचता ते पुढे फॉरवर्ड देखील केले होते , काम