थोडा है थोडे की जरुरत है @ 17.07.18
दीप से दीप सध्याच्या व्यावसायीक शैक्षणिक वातावरणात मी जे आज सांगणार आहे त्यावर सहज विश्वास ठेवणे कठीण आहे . परंतू एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी हा अनुभव वारंवार घेत असतो . परंतू आपल्या आजूबाजूचे व्यावसायीक शैक्षणिक वातावरण आपल्याला या असल्या बाबींवर विश्वास ठेवू देत नाही जे अत्यंत स्वाभाविक आहे . आजकाल या नव्या युगात मुलांचे शिक्षण हा एक मोठ्या खर्चाचा स्वतंत्र भाग झाला आहे . मुलगा किंवा मुली होण्याची चाहूल लागल्यापासूनच पालक त्याच्या किंवा तिच्या शिक्षणाच्या दृष्टीने सजग होतात . जन्माला येण्याआधी कोणत्यातरी चकाकणाऱ्या शाळेत प्रवेशाची नोंद केली जाते . ही सजगता प्रवेशापुरती मर्यादित रहात नाही तर त्या प्रवेशासोबत भरावे लागणारे शुल्क हा देखील एक महत्वाचा भाग असतो . प्ले स्कुल मधील प्रवेशासाठीही काही शाळांमधे काही हजार रुपये भरावे लागतात . सोबत शाळा नामांकित असेल तर मग विकास निधी द्यावा लागतो . परंतू चांगली शाळा असेल तर तशी तयारी करावीच लागते . या शुल्कासोबत...