Posts

Showing posts from June, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.06.21

Image
भाजणी त्या दिवशी रात्री जेवताना तिला सारखे भरून येत होते . नेहेमीसारखी तिची बडबड देखील सुरु नव्हती . रात्रीच्या जेवणाच्या वेळी घरातील सर्वांनी सोबत जेवायला बसायचे आणि दिवसभराच्या आपापल्या गमती जमती सर्वांनी एकमेकांना सांगायच्या असा तिचा दंडकच होता . जेवणाच्या वेळी टीव्ही वगैरे काही नाही . परंतू या तिच्या नियमामुळे घरातील प्रत्येकाचा तो जेवणाचा अर्धा तास मज्जेत आणि धमाल करण्यात जायचा . जेवण तर छान व्हायचेच परंतू सर्वांना सर्वांबद्दल माहिती रहायची . अन्यथा बऱ्याच घरांमधे घरातल्याच लोकांबद्दलची माहिती सोशल मिडीयावरून कळते . घरातल्या घरात एकमेकांच्या उपक्रमांबद्दल एकमेकांशी चर्चा करण्याकरीता देखील वेळ उरत नाही . त्यामुळे सुरुवातीला मुलांनी जरा टीव्ही बघण्याचा हट्ट धरला होता परंतू तिने ठामपणे नकार दिला . परंतू काहीच दिवसात मुलांना देखील असे सोबत जेवायला बसणे आवडू लागले . सर्वात जास्त बडबड मात्र तिचीच असायची . दिवसभर बराच वेळ घरी एकटी असल्याने तिला किती बोलू नि किती नाही अस