Posts

Showing posts from November, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @28.11.23

Image
अवकाळी आता लेख लिहीताना देखील पाऊस सुरु आहे . रात्रभर पाऊस कोसळला . सारे काही आलबेल असताना अचानकच पावसाने लावलेली हजेरी त्रासदायकच ठरते . पण त्याचे नावच अवकाळी पाऊस असे आहे तो निमंत्रण दिल्याविनाच येतो व होत्याचे नव्हते करून जातो . काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात भरभरून तयार झालेल्या शेतांचा फोटो बघितला . आता त्या पिकांवर या अवकाळी पावसामुळे कीड पडू शकते . मुळात या पावसाचा त्रास होतो व नुकसान जास्त सहन करावे लागते कारण यासाठी आपण तयार नसतो . संभाव्य धोक्याची कल्पना असेल तर आपण त्याचे डीफेन्स मेकॅनीझम तयार करु शकतो . परंतू या अवकाळीचे डीफेन्स मेकॅनीझम तयारच करता येत नाही कारण हा धोका कधी समोर ठाकेल ते सांगताच येत नाही . अगदी असेच काही अवकाळी व आपल्या ध्यानातही येणार नाहीत असे ताण आपल्या मनावर येत असतात . ते अवकाळी असल्याने त्यांच्याशी सामना करण्याचे डीफेन्स मेकॅनीझम आपल्याकडे तयार नसते . त्यामुळे असे ताण आपल्या मनावर साचत जातात , त्यामुळे आपला स्वभाव चिडका बन

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.11.23

Image
प्रोफेशनल रीलेशन्स सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांबद्दल कॉमेंट करताना दिसतात . फेसबुक किंवा व्हॉट्स ॲपवर एकमेकांवर टीका करतानाही आपण बघतो . कधी जातीवरून तर कधी धर्मावरून . कधी राजकीय पक्षांवरून किंवा कधी कधी थेट व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाते . काही वेळेला या टीकेचा किंवा कॉमेंट्स चा स्तर एवढा खाली असतो की सरळ शिवीगाळ देखील केली जाते . एकमेकांबद्दलचा तीव्र तिरस्कार त्या लिखाणामधे जाणवतो . लोक एकमेकांना बघून घेण्याची भाषा देखील बोलतात . सोशल मिडीयावरील पोस्ट आणि बोलणे लोक एवढ्या गंभीरतेने घेतात की आयुष्यभराचे संबंध खराब होऊन जातात . हे असे होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्याला प्रोफेशनल रीलेशन्स आणि पर्सनल रीलेशन्स मधला फरकच कळत नाही . ही दोन वेगळ्या प्रकारची रीलेशन्स असतात व त्याचा फरक ओळखूनच आपण कायम वागायला हवे ही काळाची गरज आहे . अन्यथा सोशल मिडीयावरील कॉमेंट्स च्या नादी लागून आपण जवळच्या मित्रमंडळींसोबत असलेली नाती देखील बिघडवून टाकू