थोडा है थोडे की जरुरत है @ 16.07.19
मनाचा काॅपीराईट प्रवास सुरु होता . मिरची नावाचे रेडीओवर एक चॅनेल लागले होते . त्यावर बरीच हिंदी गाणी सुरु होती . मधे मधे ते समालोचक ज्यांना आरजे अर्थात रेडीओ जाॅकी म्हणतात ते बोलत होते . मजेदार सुरु होते सारे . अचानक त्यांनी आता आपण मराठी गाणी ऐकुयात असे घोषित केले त्यामुळे मी जरा उत्सुकतेने ऐकू लागलो . कोणते मराठी गाणे लागेल याचा अंदाज करीत असतानाच मला अक्षरश : आश्चर्याचा धक्का बसावा असे गाणे त्यांनी लावले . खरे तर मी नव्या मराठी सिनेमामधील गाणे अपेक्षित केले होते परंतू हे गाणे तर एकदम फारच जुने आणि बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देणारे होते . माझ्या सोबत असलेले माझे सहकारी प्राध्यापक मित्र देखील आनंदित झाले . ते गाणे बालपणी इतके वेळा ऐकलेले होते की त्याचे सुरुवातीचे संगीत सुरु झाल्याबरोबर आम्ही दोघांनीही एकाच वेळी ते गाणे ओळखले . गाणे सुरु झाले आणि आम्ही दोघेही त्याचा छान आस्वाद घेऊ लागलो . पण पहिली ओळ ऐकल्यावर पुढची ओळ मनात आली असताना कानावर मात्र काह...