Posts

Showing posts with the label मी काय करु?.. कारण..

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.01.22

Image
मी काय करु ? कारण … मन मोकळे करणे ही माणसाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे . वेगवेगळ्या भावभावनांचा प्रवास प्रत्येकच माणसाचा कायम सुरु असतो व त्यामधे वेगवेगळ्या संवेदना व विचार त्याच्या मनात गोळा होत जातात . यामधे काही आनंदी , काही वेदनादायी , काही उत्साहित करणाऱ्या तर काही कोलमडून टाकणाऱ्या देखील असतात . या सर्व संवेदना मनात बरेचवेळा अजाणतेपणानेही साठविल्या जात असतात . परंतू या सर्व विचारांचा निचरा होणे अत्यंत गरजेचे असते . आणि अनेक लोकांसमोर तीच सर्वात मोठी समस्या असते . ग्रीक तत्त्ववेत्ता यास कॅथारसीस असे म्हणायचा . आपले मन मोकळे करणे जमत नाही व त्यामधून मग अनेक समस्या देखील उद्भवतात . नाही म्हणायला सध्या तंत्रज्ञानाच्या या जगात सोशल मिडीयाच्या प्रचंड वापरामुळे मन मोकळे करायला एक संधी प्राप्त झाली आहे . परंतू काही विचार असे असतात की जे आपण सरसकट सर्वांसोबत शेअर करु शकत नाही . ते काही मोजक्या व जवळच्या व्यक्तींकडेच मोकळे होऊ शकतात . याकरीता योग्य व्य...