Posts

Showing posts with the label अभी जो है…

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.02.24

Image
अभी जो है …. एका डोंगरी किल्ल्याच्या कड्यावर ती शांतपणे बसलेली असते . समोर विस्तिर्ण पसरलेला भुभाग , त्याच्या पुढे त्याहीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे जंगल व त्यानंतर क्षितीजावर अस्ताला जाणारे सूर्यबिंब . त्या सूर्यास्ताच्या वेळी साऱ्या भुभागावर पसरलेले गडद केशरी रंगाचे आवरण समोरच्या निसर्ग सौंदर्यात मोठी भर घालत होते . सायंकाळची अशी कातरवेळ मनाला हुरहुर तर लावतेच परंतू दिवसभर धावून धावून थकलेल्या मनाला शांत देखील करते . अशी ती शांत बसून तो अप्रतिम सूर्यास्त बघत असतानाच तो धावत धावत येतो व तिचा हात धरून तिला उठवतो . तो तिला म्हणतो , चल चल पटकन चल , तिकडे किल्ल्याच्या आतमधे लाईट ॲन्ड साऊंड शो सुरु होतो आहे . मी तिकिटे काढली आहेत . पटकन चल . तो शो मीस नको व्हायला . सूर्यास्ताच्या त्या विलोभनीय दृष्य विलक्षण भारावलेली ती , अलगद त्याचा हात सोडवते व त्याला म्हणते , तो लाईट ॲन्ड साऊंड शो बघायला गेली तर हे समोर दिसतेय ते सुंदर दृष्य मी गमावेन त्यामुळे मी येथेच बसणार ....