Posts

Showing posts with the label हिशोबाच्या पलीकडे

थोडा है थोडे की जरुरत है @ 04.02.2020

Image
हिशोबाच्या पलीकडे दोघांचा वाद सुरु होता . वादाला कारण छोटेसे होते . उल्लेखही करु नये असे . परंतू त्यावरुन सुरु झालेला वाद मात्र विकोपाला गेला होता . सर्वात पहिले त्याचे सांगणे सुरु होते . मी या घरासाठी काय काय करतो ते माझे मला माहीती आहे . अनेक वेळा तर मी काय करुन टाकतो याची दखलही कुणी घेत नाही . राब राब राबतो , दिवसभर कामे करतो नि त्यामुळे थकून जातो . या घरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणणे , येथील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडणे , कार्यालयाची कामे करणे हे सारे मी करतो . या सोबतच घरातील सर्वांना बरे वाटावे म्हणून कुठे बाहेर जाण्याचे प्लॅन करणे , त्यासाठी अतिरीक्त खर्च करणे , मुलांच्या भविष्याची तजविज करणे , त्यांना काही कमी पडायला नको म्हणून काळजी घेणे , सोबत सर्वच बाबतीत ॲडजस्ट करणे , सर्वांच्या मनाचा विचार करणे , हे सारे केल्यावरही माझ्या मनाचा विचार मात्र कुणीच करीत नाही . मला काय आवडते हे कुणी बघत नाही . प्रत्येकजण फक्त स्वतःचाच विचार करणार . आता हे स...