Posts

Showing posts from January, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 31.01.23

Image
दागिना परवा ती पुन्हा एकदा मला भेटायला आली . साधारण अठरा वर्षांनी मी तिला भेटत होतो . महाविद्यालयात दरवर्षी नव्या विद्यार्थिनी प्रवेशित होतात व दरवर्षी बऱ्याच महाविद्यालय सोडून जातात . त्यामुळे अनेक वर्षांनी भेट झाल्यावर ओळखणे जरा कठीण जाते . परंतू हिला मात्र मी ओळखले . कारण अठरा वर्षांपूर्वी आम्ही सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तिच्या व्यक्तिमत्वातील ज्या एका गोष्टीचे फार कौतुक करायचो ती गोष्ट अजूनही तशीच होती . तिच्या सोबत तिचा नवरा देखील होता . दोघेही माझ्या समोर बसले . तिला मूळ टीसी हरविल्यामुळे त्याची दुय्यम प्रत हवी होती म्हणून ती आली होती . तिच्याकडे पाहताना मला अठरा वर्षांपूर्वीचा तो क्षण आठवला जेव्हा तिने आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता . अठरा वर्षांपूर्वी ती जेव्हा महाविद्यालयात आली तेव्हा मी प्राध्यापक म्हणून कार्य करायचो व पहिल्यांदा एका कामाच्या निमित्ताने मला भेटली तेव्हा पहिल्या भेटीतच मला तिच्या व्यक्तिमत्वातील ती गोष्ट ठळकपणे जाणवली . तिला भेटण

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.01.23

Image
फुलस्टॉप एका पुस्तकात पती पत्नीच्या नातेसंबंधाबाबत एक कथा वाचली . दोघांचे नाते . लग्न झाल्यानंतर पहिली तीन वर्षे नाते सुंदर होते . एकमेकांसोबत छान जीवन सुरु होते . पण नंतर का कोण जाणे काहीतरी गडबड होत गेली . वादविवाद सुरु झाले . व शेवटी काही दिवस वेगळे राहुयात असे ठरले . वेगळे राहताना मात्र प्रेमाची तीव्र जाणीव दोघांनाही झाली . सोबत घालविलेले सारे आनंदी क्षण तिलाही आठवायचे व त्यालाही . अश्यातच तिचा वाढदिवस आला . त्या दिवशी तो आपल्याला भेटायला येईल अशी तिला मनापासून खात्री वाटत होती . त्याच्या आवडीचे सारे पदार्थ तिने बनविले व छान तयार होऊन सायंकाळी त्याची वाट बघत बसली . रात्री ८ च्या सुमारास दारावरची बेल वाजली व तिने धावत जाऊन दार उघडले . तिच्या अपेक्षेची पूर्तता करीत तो हातात तिला आवडणाऱ्या निशीगंधाच्या फुलांचा बुके व केक हातात घेऊन हसत समोर उभा होता . न राहवून तिने त्याला घट्ट मिठी मारली . वाढदिवसाचा केक कापल्यावर तिने त्याला छान जेवण वाढले . तेवढ्यात बेडरूम म