Posts

Showing posts from October, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.10.19

Image
अनोखे एकत्रीकरण आज दिवाळीच्या सणातला आणखी एक महत्वाचा दिवस . भाऊबीज . बहिण भावाचा सण . या सणानिमीत्ताने मी एका अनोख्या एकत्रीकरणाबाबत बोलणार आहे . खरे तर यात अनोखे असे काहीच नाही . आजपासून साधारण तीस वर्षांपूर्वी जी माझी पिढी युवावस्थेमधे होती त्यांना यामधे कोणतेच अनोखेपण वाटणार नाही . परंतू त्या एकत्रीकरणाची आठवण देखील मला माझ्याच पिढीला करुन द्यायची आहे . याचे महत्वाचे कारण म्हणजे , या माझ्या पिढीतील मंडळींना या असल्या एकत्रीकरणाचा आनंद ठाऊक आहे . आमच्या नंतरच्या पिढीला ते माहित असण्याचे कारण नाही कारण काळाच्या ओघात आमच्या पिढीने ते जपले नाही व त्यामुळे त्यांना संदर्भासाठी काहीच नाही . म्हणूनच बदललेल्या या काळात आपण आपल्या घरी साऱ्या सुख सोयी निर्माण केल्या , आपले जीवन सुखकर बनविले परंतू काही महत्वाच्या गोष्टी मात्र गमावल्या त्याचीच आठवण मला या निमीत्ताने करुन द्यायची व घ्यायची आहे . आणि या आठवणी करीता भाऊबिजेसारखा प्रसंग अत्यंत सुयोग्य आहे . अर्थात मी सांगतो ते