थोडा है थोडे की जरुरत है @ 16.11.21
विरोधाभास कौटुंबिक सौहार्दतेबद्दलचे त्या ख्यातनाम वक्त्याचे विचार ऐकून सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते . आधुनिक बदलत्या काळात कुटंबांमधे निर्माण होणाऱ्या समस्या व त्यामुळे निर्माण होणारा ताण याबद्दलचे त्यांचे विवेचन अप्रतिम होते . बदलत्या काळात घरातल्या घरातही जे इगो क्लॅशेस सुरु झालेत व त्यामुळे जे तणावाचे वातावरण तयार होते याबद्दलचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता हे त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होते . या सोबतच या संपुर्ण विचारांना त्यांनी मानसशास्त्रीय आधार देखील दिला होता . बदलत्या काळात नाती सांभाळताना आता जुन्या संकल्पनांना नव्या पद्धतीने मांडणे किती गरजेचे आहे व नात्यांबद्दलचा एकुणच दृष्टीकोन कसा बदलण्याची गरज आहे हे त्यांनी फारच फ्रभावीपणे सांगितले होते . साधारण दिड तासापर्यंत त्यांचे विचार ऐकल्यावर सभागृहातील प्रत्येकाला आपल्या जीवनात यामुळे निश्चितच बदल करता येईल अशी भावना निर्माण झाली . बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याला बळकटी आणण्याकरीता जी उदाहरणे दिली ती ...