थोडा है थोडे की जरुरत है@19.02.19
आम्ही आहोत ! अचानक ती घटना घडून गेली . ध्यानी मनी नसताना अचानक दुःखाचा एवढा मोठा पहाड आमच्या एका मैत्रीणीवर कोसळला . सारे काही कसे सुरळीत सुरु होते . एक अत्यंत सुखी व समाधानी मध्यमवर्गीय परीवार असा उल्लेख करावा असेच तिचे सारे व्यवस्थित होते . छान टुमदार घर , नवरा मोठ्या कंपनीत चांगल्या नोकरीवर , एक मुलगा आणि एक मुलगी , सोबतीला ही देखील एका कार्यालयात नोकरी करायची . घरी सासू सासरे , छान भरलेले घर असे सारे छान होते . लग्नानंतर घरच्या सर्वांनी खूप पाठबळ देऊन शिक्षण घ्यायला लावलेले व त्यानंतर आग्रहाने नोकरी देखील करायला लावली . तिने देखील घरच्या तिच्या कर्तव्यांच्या आड नोकरीचे कारण येऊ दिले नाही . सारे काही नीट सांभाळणे हा तिचा स्थायी भावच होता . नवरा देखील तिला प्रत्येकच बाबतीत आधार द्यायचा . घरासंबंधीच्या बऱ्याचश्या गोष्टी तर तो तिला न कळताच करुन टाकायचा . त्या झाल्यावरच आपल्या नवऱ्याने हे काळजीने केलेले आहे याची तिला जाणीव व्हायची . तिच्या लग्नापूर्वीच्या जीवनातील ...