Posts

Showing posts with the label निदान एक खांदा हवा..

थोडा है थोडे की जरुरत है @ 17.04.18

Image
निदान एक खांदा हवा … दामोदरचे व्यक्तीमत्व सर्वांनाच आवडायचे . अतिशय उत्साही असलेला दामोदर खरे तर आमच्यासाठी दामू होता . अगदी महाविद्यालयीन काळापासून दामू जिवनाचा प्रत्येक क्षण मनापासून जगतोय असे वाटायचे . त्याचे अस्तित्व प्रत्येकच ग्रुपमधे चैतन्य निर्माण करायचे . अनेक गुण त्याच्या ठायी होते . अक्षर अतिशय छान होते , अनेकांच्या नकला करणे त्याला फार लिलया जमायचे . कवितांचा फॅन होता तो . गुलजार तर संपुर्ण पाठ होते त्याच्या . सगळे जण बसले असताना अचानक गुलजारच्या ओळी ऐकवून त्यावरचा त्याला भावलेला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगण्यात त्याला मजा वाटायची . गुलजार ज्या तरलतेने लिहायचे त्याच तरलतेने आवाजाचे चढ उतार करुन त्या ओळींचा परीणाम साधण्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा . त्याचे सोबत असणे फार सुखकारक असायचे . आमच्या ग्रुपमधे त्याच्या त्या कवितांचीच मजा असायची . विशेषतः आमच्या ट्रेकींग ग्रुपचे कॅम्प फायर आटोपल्यावर जेव्हा सारे धुमाकुळ घालून शांत झाले की मग दामुची मैफल असायची . वेगवेगळ्या कवी...