Posts

Showing posts from January, 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 28.01.2020

Image
परफेक्ट ॲंगल एका मित्राच्या मुलीच्या लग्नात मला तो दिसला . खरे तर सर्वांनाच त्याचे अस्तित्व जाणवत होते . कारण तो कामच असे करीत होता की त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाणारच होते . परंतू त्याचे आणखी एक वैशिष्ट्य असल्याने त्या सबंध सभागृहात त्याचा वावर ठळकपणे जाणवित होता . रात्रीच्या वेळी सिमांत पुजनाचा कार्यक्रम सुरु होता व त्या कार्यक्रमात त्याचा सहभाग जास्त होता . तसेच लग्नाच्या दिवशी देखील होमाच्या वेळी , किंवा सुनमुखाच्या वेळी त्याच्यावरच काही जबाबदाऱ्या मुद्दाम देण्यात येत होत्या . त्याच्या कामामधे तो सराईत असावा कारण त्याच्यावर ती जबाबदारी सोपवून त्याचे सर्व साथीदार बिनधास्तपणे आराम करीत होते आणि हा आपले काम चोख बजावित होता . माझ्या तो स्मरणात राहून गेला कारण त्याच्या ठायी असलेले एक आगळे वेगळे वैशिष्ट्य . ज्याचे काम बघून मी फारच प्रभावित झालो व त्याला मी अद्यापही विसरु शकलो नाही तो म्हणजे त्या लग्नात मला भेटलेला एक फोटोग्राफर . आजकाल लग्नांमधे फोटोग्राफी हा